सुरगाणा तालुक्यातील पिंपळपाडा(करंजुल)भवाडा येतील शाळा दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे सभापती मनीषा महाले यांनी घेतली दखल
विजय कानडे
पिंपळपाडा (करंजुल) भवाडा ग्रामपंचायत या ठिकाणी माजी आमदार मा जे पी गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती मनीषा महाले यांच्या सहकार्यातून व बोडके साहेब यांच्या प्रयत्नातून शाळा दुरुस्तीसाठी 2लाख 25 हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता मात्र या शाळा दुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार नंदराज बारे व ग्रामस्थांनी सभापतिकडे केली म्हणून सभापती मॅडम ने इ व द चे शाखा अभियंता गरुड साहेब व उपअभियंता राठोड साहेब व ठेकेदार यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी तक्रारींचे निवारण करण्यासाठी बोलावले या सर्वांना काम दाखवली आणि खरोखरच काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते,मॅडम समोर ग्रामस्थनी अक्षरशः तक्रारीचा पाढाच वाचला, पत्रे जुने वापरले होते ते त्यांनी मान्य केले,पत्रे एका लाईन मध्ये ठोकले नव्हते म्हणून सर्व पत्रे बदलून एका लाईन मध्ये करून देतो व थोडेसे भिंतीच्या बाहेर पण काढतो म्हणजे पावसाचे पाणी भिंतीवर पडणार नाही,त्यांनी आपली चूक मान्य करून काम पुन्हा नव्याने करून देण्याचे मान्य केले ,मी सभापती आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करते की आपल्या गावात कुठलेही काम जर सुरू असेल अथवा होणारे असेल तर आपण ग्रामस्थांनी लक्ष देऊन व्यवस्थित करून घ्या चुकीचे काम होत असेल तर समंधीत विभागाकडे तक्रार करा आणि आपल्याला तक्रार करण्यास अडचण असेल तर मला फोन करा आपल्या तक्रारीची योग्य तो दखल घेतली जाईल प्रत्येक ठिकाणी पदाधिकारी लक्ष देऊ शकत नाही तरी आपण स्वतः लक्ष द्यावे.पिंपळपाडा चे ग्रामस्थांनी तक्रार केली म्हणून त्याचे शाळेचे काम आता निश्चित चांगले करून घेण्याची जबाबदारी आता आमची आहे आपणही एक जबाबदार नागरिक बना.






