Yawal

हिंगोणा येथिल गोठा प्रकरण पुन्हा तापले .. गोठा पुर्ण असुन सुद्धा अनुदान दिले नाही ग्रामविकास अधिकारी .व. गटविकास अधिकारी यांनी अनुदान देण्यास टाळाटाळ. तरी त्यांच्या वर कार्यवाही होणार का.?

हिंगोणा येथिल गोठा प्रकरण पुन्हा तापले ..
गोठा पुर्ण असुन सुद्धा अनुदान दिले नाही
ग्रामविकास अधिकारी .व.
गटविकास अधिकारी यांनी अनुदान देण्यास टाळाटाळ.
तरी त्यांच्या वर कार्यवाही होणार का.
लाभार्थीनीं दिले .जिल्हा अधिकारी यांना निवेदन
समस्या यावल पं.स.मनरेगाची
येणाऱ्या केंद्र समितीने .दखल घ्यावी

शब्बीर खान यावल

यावल ( प्रतिनीधी) यावल तालुक्यातिल मौजे.. हिंगोणे येथिल रहीवासी लार्भार्थी.
१ ) शेख निसार शेख रशीद
2) सौ. शबाना बी शेख मुख्तार
हे.दोन्ही असुन यांचे. म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत सन 2018-19 या आर्थिक.वर्षात गुरांचा गोठा बांधकाम मंजूर झालेले आहे. ग्रामपंचायतच्या (म.गां.रा.ग्रा.रो.ह योजना)
खात्यात गोठा बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण 12 लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाले होते.
त्यापैकी 9 लाभार्थ्यांची रक्कम ग्रामसेवक श्री. देवानंद श्रावण सोनवणे यांनी अदा केली. यामध्ये गोठा बांधकाम न केलेले लाभार्थी सुध्दा होते. (त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार करून) तसेच . या दोन लाभार्थीनीं पैसे दिले नाही म्हणून त्यांचा गोठा बांधकाम पूर्ण असतांना सुध्दा त्यांना लाभा पासून .वंचीत ठेवले. तसेच त्यांना
अनुदानाची रक्कम (पेमेंट) दिले नाही.
त्यानंतर गावातील आकाश तायडे नामक युवकाने जिल्हाधिकारी यांच्या कडे. बोगस गोठा
बांधकामाबाबत चौकशी करणे बद्दल तक्रार दाखल केली. होती त्यानिमित्ताने यावल येथील मा.गटविकास अधिकारी श्री. डा. निलेश पाटील यांनी दि. 28/10/2020 रोजी प्रत्यक्ष
स्थळी जाऊन तोंडपाहून चौकशी केली. चौकशी निःपक्षपणे केलेली नाही. चौकशी दरम्यान
सात लाभार्थ्यांनी गोठा बांधकाम केलेले नाही. सात पैकी दोन लाभार्थ्यांना मा. गटविकास
अधिकारी यांनी साधी नोटीससुध्दा दिली नाही. (फेर चौकशी दरम्यान ते लाभार्थ्यांचे गोठे समोर येणारच . बाकी राहिलेल्या लाभार्थीना सुध्दा त्यांनी गोठे बांधकामा बाबत
नोटीसी दिल्या त्या नोटीसीचा या . दोन अर्जदारांना सुध्दा दिल्या होत्या त्यानी खुलासा पण . गटविकास अधिकारी पं.स.यावल यांना दिला. होता . गटविकास अधिकारी पं.स. यावल .
डा.निलेश पाटील हे या दोन लाभार्थांनां गोठा बांधकाम अनुदान देणेस टाळाटाळ करीत आहे.
त्यांचेकडे वारंवार जाऊन सुध्दा त्यांनी गोठा बांधकाम अनुदान दिले नाही. (त्यांना
लाभार्थांन कडून पैशांची अपेक्षा आहे अंसे समजते.
शेवटी बि. डी.ओ. यांनी.तांत्रिक अधिकारी (नरेगा) पंचायत समिती यावल यांना तोंडी सुचना
देवून दि. 5/8/2021 रोजी गोठा बांधकाम पाहणी करणेसाठी पाठविले. तांत्रिक अधिकारी
(नरेगा) पं.स.यावल यांनी गोठा पाहणी केल्यानंतर त्यांच्या अहवालामध्ये 1) शबानाबी शेख
मुख्तार 2) शेख निसार शेख रशिद यांनी अंदाज पत्रक प्रमाणे काम केलेले आहे असा
अहवाल म.गटविकास अधिकारी पं.स.यावल यांना दिला .
त्यानंतर सुध्दा गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील म्हणतात, “दोन नाही एकच गोठा आहे, मी एकच गोठ्याचे अनुदान देईल”,
तांत्रिक अधिकारी (नरेगा) म्हणतात दोन गोठे
आहेत व गटविकास अधिकारी म्हणतात एकच गोठा आहे. जर सर्व निर्णय गटविकास अधिकारीच घेतील तर शासकीय कार्यालयात इतर अधिकारींची नियुक्ती कशासाठी हा
एक प्रकारचा त्यांचा हिटलरपणाच समजावा.
तरी या. दोन लाभार्थीं नां ग्रामसेवक श्री. देवानंद श्रावण सोनवणे य यावल पं.स. गटविकास अधिकारी डॉ..निलेश पाटील हे हेतूपुरस्कर शासनाचे लाभापासून वंचित ठेवत आहेत. व मानसिक त्रासही देत आहेत, सदर
गोठा बांधकाम अनुदान मिळणेकामी
निर्णय व्हावा व मौजे हिंगोणे ता. यावल येथील गोठा बांधकाम न करता पेमेंट दिले प्रकरणी शासनाच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या खालील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून यांची चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी या दोन लाभार्थांनीं जिल्हा अधिकारी . यांच्याकडे केली आहे.

ज्या लाभार्थ्यांना गोठा बांधकाम न करता पं.स.यावल यांचेकडून अनुदान वितरीत
करण्यात आले त्यास जबाबदार खालील अधिकारी धरण्यात यावे.
1. तत्कालिन तांत्रिक अधिकारी (नरेगा) पं.स.यावल – ज्यांनी गोठा बांधकाम पूर्ण
झालेला नसतांना गोठ्याची मोजमाप नोंद पुस्तिकेत नोंद केली.
2. तत्कालिन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (नरेगा) APO – ज्यांनी मोजमाप नोंद
पुस्तिकेतील नोंदीची शहानिशा न करता त्यावर स्वाक्षरी केली.
3. तत्कालीन गटविकास अधिकारी पं.स.यावल – ज्यांनी सदर गोठ्याची पाहणी न
करता TPO व APO यांनी तयार केलेल्या बिलावर स्वाक्षरी केली.
4. तत्कालीन ग्रामसेवक ग्रा.पं.हिंगोणे – बिल ग्रा.पं. (नरेगा) च्या खात्यात जमा
झालेनंतर गोठा बांधकाम पूर्ण झाले की नाही पाहणी न करता बील अदा केले.
5. गटविकास अधिकारी, पं.स.यावल डा.निलेश पाटील यांनी दि. 28-10-2020 रोजी
गोठ्याची चौकशी मध्ये लाभार्थ्यांनी गोठा बांधलेला नसतांना सुध्दा दोन लाभार्थ्यांना
साधी नोटीस सुध्दा दिली नाही व आपल्या कर्तव्यात कसुर केले म्हणून त्यांचेवर
सुध्दा चौकशी अंती कार्यवाही करणेत यावी.
त्याच प्रमाणे वरीष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही
करण्यात यावी व गोठा बांधकाम अनुदान अदा करणे बाबत आदेश व्हावे .
(सदर चौकशी वेळी आम्ही तुम्हाला गोठे बांधकाम प्रत्यक्ष दाखवू) असे अर्जदार .
1) श्री.शेख निसार शेख रशीद
2) सौ. शबाना बी .शेख.मुख्तार
सदर अर्जदार यांना न्यान न मिळाले तर ते उपोषण करणार असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.तसेच माहीती साठी
. मा.ना. गुलाबरावजी पाटील
पालक मंत्री, जळगांव यांना प्रत दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button