Nashik

नाशिकरोड परिसरातील सफाई कर्मचार्यांना नागरिकांनी दिली मानवंदना

नाशिकरोड परिसरातील सफाई कर्मचार्यांना नागरिकांनी दिली मानवंदना

सुनिल घुमरे

नासिक रोड येथील जेलरोड,पंचक,आयोध्यानगरी परिसरातील नागरिकांनी कोरोना महामारीच्या संकटात नासिकरोड जेलरोड परिसरात मनपाच्या सफाई कामगारांनी अहोरात्र मेहनत घेत जे सफाई,स्वच्छतेचे कार्य करत आहेत व नागरिकांना स्वच्छतेचे महत्वही लक्षात येत आहेत.याकामी ऩासिकरोड जेलरोड परिसरातील आयोध्यानगरी येथील रहिवासी विश्वनाथ पांडूरंग वाणी,चंद्रकांत खोलमकर,मगन हरी थोरात,मनोहर बाबुराव बोराडे,नाना मोरे,विजय खुडे सर यांनी मनपा घंटागाडी कर्मचारी वाहन चालक श्री गणेश साळुंखे,जगतराव बाविसकर,धिरज खैरे यांचे शाल ,पुष्पहार,श्रीफळ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

तसेच परिसरातील महिला,मुले ,रहिवाश्यांनी सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत सर्व सफाई कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले.गिरिश देशमुख,सचिन साळवे,कोळसे,सचिन खुडे सर,अतुल आगवणे,डांगे,बडगुजर,बागुल काका,भुतेकरसाहेब,नागपुरे,डॉ.आहिरराव,नागरे साहेब परिसरातील सर्व रहिवाशांनी पुष्पवृष्टी ,रांगोळी,काढत सफाई कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button