Maharashtra

हिरड्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या प्रशासनाने आदिवासी बांधवांना न्याय द्यावा.

हिरड्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – प्रशासनाने आदिवासी बांधवांना न्याय द्यावा.

प्रतिनिधी -दिलीप आंबवणे

आदिवासी भागातील हिरडाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.
आदिवासी भागातील प्रमुख उत्पन्नाचे साधन म्हणजे हिरडा. मात्र या मे महिन्यात अवकाळी पावसाने हिरडाचा बार बराच पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हिरडीच्या झाडाला म्हणावे तसे हिरडे आले नाहीत. दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात पुर्ण हिरड्या वेचून वाळवून होत असतात पण या वर्षी एप्रिल महिन्यात येणारा हिरडा मे महिनाचा अर्था महिना संपला तेव्हा आला. आणि काल च्या चक्रीवादळ पासून दोन तीन दिवस पाऊस पडत आहे मग आदिवासी बांधवांनी हिरडा कसा वाळवायचा असा प्रश्न पडला आहे. अजून ही एक क्विटल हिरडा वाळायचा बाकी आहे.
तरी आदिवासी बांधवांना बाळहिरडा हा वर्षाकाठी एकदाच येतो तो पण या वर्षी निसर्गाने घाला घातला. तरी मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांचे हिरडाचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शाश्वत संस्थाचे अध्यक्ष बुधाजी डामसे व बिरसा क्रांती दल राज्य सचिव डी. बी. घोडे यांनी केले आहे.
डामसे म्हणाले, अनेक वर्षांपासून आदिवासी बांधवांच्या मालकी जमिनीवर हिरड्याची झाडे हे सातबारा वर नोंदणी करावी अशी मागणी अनेक वेळा केली पण काही नागरिकांनी आदिवासी बांधवांचे वार्षिक उत्पन्न वाढले असा चुकीचा बाजू अधिकारी समोर माडून हिरडाच्या झाडाची नोंद आजपर्यंत केली नाही तसेच हिरड्याचा झाडांची नोंद केली तर दारिद्र्य रेषेखालील नाव राहणार नाही असे सांगून आदिवासी बांधवांचा सातबारा हिरड्याच्या झाडापासून वंचित राहिला आहे. तरी सरसकट आदिवासी बांधवांच्या सातबारा वर हिरड्यांची झाडाची नोंद करावी अशी मागणी बिरसा क्रांती दल खेड तालुका अध्यक्ष रोहित सुपे यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button