Pune

इंदापूर तालुक्यात बिबट्याचे आगमन

इंदापूर तालुक्यात बिबट्याचे आगमन

दत्ता पारेकर पुणे

पुणे : करमाळा व कर्जत तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धूमाकुळ घातलेला असून, यामध्ये तीन नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता भिगवण परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरीकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भिगवण येथील शेतकरी पोपटराव जगताप यांच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम चालू असताना, रात्रीच्या वेळी शेतामध्ये ऊस ट्रॅक्टर मध्ये भरण्याचे काम चालू असताना, ते हातामध्ये बॅटरी धरून उभे होते. यावेळी त्यांच्याबरोबर इतरही चार कामगार होते त्यापैकी दादाजी सोनवणे व दीपक तलवारे या दोघांना काही आवाज आल्याचे जाणवले व त्यांनी पाहिले असता त्यांना दोन बिबटे जवळ येताना दिसले यावेळी त्यांनी आरडा ओरडा केला त्याचवेळी ट्राॅलीवरील कामगारांनी ऊसाची मोळी खाली फेकली व तेथे असणाऱ्या जमावामुळे बिबट्याला तेथुन पळवणे शक्य झाले व मोठे संकट टळले. या प्रसंगामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यानंतर त्याच पाठोपाठ शेजारीच असणारे शेतकरी निखील गुणवरे यांना दि.०६ रोजी सायंकाळी ६.०० दरम्यान बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येते आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असताना वनविभाग यांच्याकडून कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही.

तीन पिल्ले असण्याची दाट शक्यता
याच ठिकाणी दहा दिवसापूर्वी जगताप याच्या शेताजवळ ऊसतोड चालु असताना बिबट्याची तीन पिल्ले दिसल्याचे ऊस कामगार सांगत होते, पंरतु या घटनेकडे कानडोळा केल्याचे पांडुरंग जगताप यांनी सांगितले.

भिगवण येथील घटनेची चौकशी करत असताना बिबट्याचे पायाचे मिळते जुळते ठसे आढळून आले असून त्याचे केस ही मिळून आले आहेत म्हणून यावर तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना केली जाईल. त्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. विनाकारण बाहेर पडू नये, रात्री शेतात जावू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये.
– वनअधिकारी राहुल काळे

भिगवण परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी, शेतात काम करण्यासाठी एकटे बाहेर पडू नये. मोठ्या आवाजाची साधने बाळगत काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.
– जीवन माने, पोलीस निरीक्षक भिगवण

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button