ऐनपूर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा.
निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या संस्थेतील सर्व प्राध्यापकांचा ,शिक्षकांचाव शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनी सत्कार करुन सन्मान करीत असते. महाविद्यालयात साजरा करण्यात आलेलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले. संस्थेतर्फे रामदास महाजन व एन व्ही पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा महेंद्र सोनवणे यांनी संस्थेने केलेल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की हा सत्कार म्हणजे कौतुकाची थाप आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आवश्यक ती मेहनत नेहमीच घेत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. सुत्रसंचलन डॉ किशोर गोविंद कोल्हे यांनी केले.आभार डॉ एस ए पाटील यांनी मानले.






