जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व १० वी १२ उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याचा सत्कार सोहळा
राहुल साळुंके
वकवाड ता. शिरपूर येथे आज दिनांक ९ ऑगस्ट २०२० रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व १० वी १२ उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील समस्त समाजबांधवांनी जागतिक आदिवासी दिवस लोकडाऊन मुळे काही नियम व मर्यादा पाडून सण साजरा करण्याचे अवचित्त साधून social distancing च पालन करून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला MADA (महाराष्ट्र आदिवासी डॉकटर्स असोसिएशन) तसेच JAYS(जय आदिवासी युवा शक्ती महाराष्ट्र मुकेश भाई पटेल ब्लड बँक शिरपूर तसेच ग्रामपंचायत वकवाड व जागतिक आदिवासी उत्सव समिती जयस वकवाड यांचा संयुक्त विद्यामानाने ९ ऑगस्ट २०२० जागतिक आदिवासी दिनानिमित्त रक्तदान शिबिर करण्यात आले त्या करीता सर्वांचे सहकार्य लाभले मागील वर्षी ह्या दिवशी कोदिड येथे केलेले रक्तदान आपल्या समाजबांदवांसाठी वरदान ठरले होते मागील वर्षी वाघाडी तालुका शिरपूर येथील कंपनी जळीत कांडात आपले आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते.
मागील वर्षी या दिवशी केलेल्या रक्तदान करून साठवलेले रक्त गरीब व गरजू लोकांचा कामी आले होते दान केलेले रक्त आपल्या गरजू आदिवासी बांधवाना तात्काळ उपलब्ध होण्यासाठी सदर ब्लड बँक तयार आहेत त्यावेळी रक्तदानाचा कार्यक्रम तसेच मास्क व आदिवासी दिनानिमित्त टी शर्टचे वाटप करण्यात आले.






