Chimur

ओबीसी ची जनगणना करा .. डॉ सतीश वारजूकर

ओबीसी ची जनगणना करा .. डॉ सतीश वारजूकर

केंद्र सरकारच्या विरोधात युवक कांग्रेस चे धरणे आंदोलन

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

देश स्वतंत्र झाल्यापासून ओबीसी ची जनगणना झाली नाही परंतु केंद्र शासनाने जनगणना प्रकिया सुरू केली असली तरी त्यात ओबीसी चा रकाना नसल्याने ओबीसी जनगणना होत नाही त्यामुळे ओबीसी ची जनगणना करावी अन्यथा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कांग्रेस चे महाविकास आघाडी विधानसभा समनव्यक तथा जीप गट नेते डॉ सतीश वारजूकर यांनी दिला
चिमूर तहसील कार्यालय समोर युवक कांग्रेस तालुका चिमूर च्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात डॉ सतीश वारजूकर बोलत होते यावेळी पस सभापती लता पिसे पस सदस्य शांताराम सेलवटकर पस सदस्य नर्मदा रामटेके पस सदस्य भावना बावनकर कांग्रेस जिल्हा सरचिटणीस गावंडे वीलास डांगे रहमान शेख विजय डाबरे गीतांजली थुटे सरपंच भगत उपसरपंच चौधरी गौतम पाटील पपू शेख आदी उपस्थित होते.

डॉ सतीश वारजूकर पुढे म्हणाले की मागील भाजप शासनाने केवळ घोषणाचा पाऊस पाडला असून केंद्र शासन विविध योजनेतील थकीत निधी देत नसल्याने लाभार्थ्यांना त्रास होत आहे घरकुल लाभार्थ्यांना अतिक्रमण पट्टे द्यावे तसेच केंद्र सरकारकडून नुकसान भरपाई द्यावी यावर सविस्तर मार्गदर्शन करीत नुकतेच तीन महिन्यापूर्वी स्थापन झालेले महाविकास आघाडी शासन जनकल्याणकारी योजना राबवित असल्याचे सांगत संथगतीने रस्त्यांची कामे होत असल्याने दुतर्फा असलेल्या शेतपिकांचे नुकसान होत असल्याने व अतिक्रमणच्या नावावर दुकाने हटविल्याने युवक बेरोजगार झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याची सुद्धा टीका केली.

संचालन प्रशांत डवले यांनी केले युवक कांग्रेस च्या वतीने नायब तहसीलदार यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले तालुक्यातील युवक महिला व कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button