Chandwad

चांदवडला पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस,प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी

चांदवडला पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस,प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी

उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहरात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास बस स्टँड परिसरात जवळपास 10 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.यात प्रामुख्याने किसन ऑटोमोबाईलचे संचालक श्री शांताराम घुले हे एक बंद पडलेल्या गाडीला मदत करण्यासाठी गेले असताना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला तसेच काही लहान मुले त्याच परिसरातुन जात असताना त्यांना कुत्र्याने चावा घेतला.ही बालके व श्री घुले तसेच पत्रकार धनंजय पाटील व इतर व्यक्ती हे तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले तेथे त्यांना अँटीरेबीज इंजेक्शन व इतर उपचार करण्यात आले.शांताराम घुले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की चांदवड नगरपरिषद स्वच्छता विभागाने ह्या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
याबाबत कुत्र्यांचा बंदोबस्त करणाऱ्या खाजगी व्यक्तीस पुरेसा मोबदलाच दिला जात नसल्याची चर्चा चांदवड शहरात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button