इतिहास संकलन समितीच्या जिल्हा महिला प्रमुख पदी भारती सुनील साठे यांची नियुक्ती
हिंगोणा ता यावल( बातमिदार) शब्बीर खान
अखिल भारतीय इतिहास संकलन योजना अंतर्गत इतिहास संकलन संस्थेच्या जळगाव जिल्ह्याच्या महिला विभाग प्रमुख पदी डांभुर्णी ता यावल येथील शिक्षिका सौ भारती सुनील साठे यांची नियुक्ती करण्यात आली,
इतिहास विषयातील संशोधन, प्रबोधन, संकलन आणि आकलन यात अग्रेसर असणाऱ्या संघटनेने भारतीय संस्कृती आणि समाज यात मोलाचे योगदान दिले आहे ,ह्या संघटनेच्या महिला विभागाच्या जिल्हा प्रमुख पदी सौ भारती सुनील साठे याची निवड प्रांताध्यक्ष प्रा डॉ राधाकृष्ण जोशी यांनी एका पत्रकान्वये करण्यात आली प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले .






