India

आरोग्याचा मुलमंत्र…संधिवात लक्षणे व उपचार

आरोग्याचा मुलमंत्र…संधिवात लक्षणे व उपचार

‘संधिवात’ या शब्दाची फोड केली तर संधि म्हणजे सांधा आणि वात म्हणजे दुखणे.. त्यामुळे सांधेदुखी यालाच ‘संधिवात’ असे म्हणतात. ज्या ठिकाणी दोन किंवा त्याहून अधिक हाडे एकत्र येत स्नायू आणि मांसपेशी जोडल्या जातात अशा भागाला आपण सांधा म्हणतो. संधिवातामध्ये सांध्याला सूज येऊ लागते. सूजलेला भाग खूप दुखू लागतो. मॉर्डन सायन्समध्ये अशा दुखण्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याला आथ्ररायटिस किंवा सोरायटिक असेही म्हणतात. आयुर्वेदामध्ये आमवात (आथ्ररायटिस) आणि संधिगतवात (ऑस्टिआथ्ररायटिस) नावानेही ओळखले जातात.

लक्षणें

1. सांधे दुखणे
2. सांधे अडकल्या सारखे वाटणे
3. चयापचंय क्रिया बिघडणे
4. सांधे गरम लागणे
5. स्नायू कमकुवत होने

संध्यातील पेशी (Tissue) नैसर्गिकरित्या कमी होने, जंतू संसर्ग, संध्यांचजी झीझ होने या सारख्या पुष्कळ कारणांमुळे संधीवात होऊ शकतो.

उपाय

१. व्यायाम
संधिवातामुळे तुमचे सांधे दुखत असले तरी देखील तुम्हाला त्यांची हालचाल राखणे फारच गरजेचे असते. जर तुम्हाला संधीवातापासून सुटका हवी असेल तर तुम्ही नियमित थोडा का असेना व्यायाम करायला सुरुवात करा. शक्य असेल तितका व्यायाम तुमच्या सांधेदुखीला कमी करण्यास मदत करु शकतो. तुमचे अंग दुखते म्हणून तुम्ही तसेच पडून राहात असाल तर तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन चालणे, धावणे, सूर्यनमस्कार काही सोपी आसने नक्की करुन पाहा.

२. गरम पाणी किंवा थंड पाण्याचा शेक
संधिवातासाठी गरम पाण्याचा शेक आणि बर्फाचा शेक हा दोन्ही फायदेशीर ठरु शकतो कारण यामध्ये तुमची हाडं एकमेकांना घासली जातात. हाड सत घासल्यामुळे तेथील मांसपेशीदेखील कडक होतात. गरम पाण्याचा शेक घेतल्यामुळे हाडांना आलेला कडकपणा थोडा कमी होतो. तर संधिवातामध्ये अनेकदा शरीराला सूज येते ही सूज कमी करण्याचे काम बर्फ करु शकते.

३. हळदी चा आहारात समावेश
हळदीमधील नैसर्गिक घटक हे शरीराची जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच संधिवात असलेल्यांनी त्यांच्या आहारात हळदीचा समावेश करावा असे म्हटले जाते. भारतीय जेवणामध्ये हळद ही अगदी हमखास वापरली जाते. पण तरीही त्याचा वापर तुम्ही करत नसाल तर चिमूटभर हळदीचा उपयोग तरी करा.

४. योग्य प्रकारे आहार घेणे
संधिवातासाठी कारणीभूत असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे वाढते वजन. त्यासाठी कारणीभूत म्हणजे तुमचा आहार. तुमच्या शरीरात प्रोटीनयुक्त आहार जाणे फारच असते. प्रोटीन कशातून मिळते असा तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही दूध, अंडी, चिकन, पालेभाज्या, कडधान्य यांचा अधिकाधिक समावेश तुमच्या आहारात करायला हवा.

५. आलं (अद्रक)
किचनमध्ये अगदी हमखास असणारे आले हे आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते. यामधील दाहनाशक घटक तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे तुम्ही आहारात आल्याचा समावेश करा. तुम्ही आल्याचा चहा करुन प्यायाला तरी चालेल. आले पाण्यात टाकून तुम्ही त्याही पाण्याचे सेवन करु शकता. पण त्याचे सेवनही प्रमाणात असू द्या.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथिक तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button