रावेर

निसर्ग मित्र भाटखेडा यांनी आदिवासी तांड्यांवर दिवाळी शुभेच्छा भेट व फराळाचे वाटप केले…

निसर्ग मित्र भाटखेडा यांनी आदिवासी तांड्यांवर दिवाळी शुभेच्छा भेट व फराळाचे वाटप केले…

विलास ताठे
दिवाळी म्हणलं कि लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद लखलखतो, दिवे, फटाके, गोड-धोड, लाईटची रोषणाई नातेवाईकांची आवक-जावक, अनेकांना हे सर्व शब्द माहीतही नसावेत, दिवस रात्र काबाड कष्ट करून दोन वेळेची चटणी भाकरीची सोय करू पाहणाऱ्यांसाठी दिवाळी येणार म्हणलं की धसकाच बसत असेल, की आपलं पोरगं आपल्याला काय मागत, दुसऱ्याचे मुलं फटाके उडवताना वेड्या सारखं नाचणं आणि त्यानंतर त्या फटाक्यांचा कचरा नेऊन आपल्या दारात जाळून समाधान मानणे, ही त्या गरिबांची दिवाळी, बाजारात मिठाईच्या दुकानाकडे कुतुहलहाने पाहणे व दुकानात जाऊन मिठाईकडे बोट दाखवून, ही गोड असतंय का? असं विचारून तोंडातल्या तोंडात थुका गिळून समाधान मानणे, ही त्या गरिबांची दिवाळी.

परंतु आपल्या प्रमाणेच यांनाही दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाचा आनंद घेता यावा म्हणून यांना थोडं दिवाळी भेट व फराळ वाटप करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन आज दिनांक 23 ऑक्टोबर 2019 रोजी पिंपरकुंड व गारबर्डी आदिवासी तांड्यांवर जाऊन आदिवासी दुर्गम भागातील वंचित मुलांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी दिवाळी सणानिमित्त दिवाळीच्या फराळाचे व भेट वस्तूचे वाटप करून या लहान मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा माफक प्रयत्न भाटखेडा ता रावेर या गावातील तरुण मित्रांच्या *निसर्ग मित्र* या गृप मार्फत करण्यात आला. यासाठी या तरुणांनी स्वखर्चातून व इतर सहकाऱ्यांकडून निधी गोळा करून हा उपक्रम राबविला.

या उपक्रमाला श्री आर के पाटील सर, श्री हबीब तडवी सर, श्री रविंद्र पाटील सर, श्री कृष्णा ठाकरे सर, श्री मुनाफ तडवी सर, श्री आर एस पाटील सर, श्री ललित जंगले सर व श्री दीपक कोळी ग्रामसेवक भाटखेडा यांचे अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
यानिमित्ताने आम्हा सर्वांना निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवांची जीवनपद्धती, राहणीमान, काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा केविलवाणा प्रयत्न जवळून अनुभवयास मिळाला.
आदिवासी दुर्गम भागातील वंचित मुलांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी दिवाळी सणानिमित्त दिवाळीच्या फराळाचे व भेट वस्तूचे वाटप करण्याच्या प्रांजळ प्रयत्नाचे भाटखेडा गावातील निसर्ग मित्र तरुणांचे मोठ्यांनी कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविले आणि असे सत्कार्य निरंतर सुरु ठेवण्यासाठी पाठबळ दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button