Nashik

चिंचखेड येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

चिंचखेड येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सुनिल घुमरे

– नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली . दत्तात्रय बाबुराव लभडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते 51 वर्षांचे होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे चिंचखेड येथील रहिवासी अल्पभूधारक शेतकरी दत्तात्रय लभडे यांच्यावर देना बँकेचे नऊ लाख रुपये कर्ज आणि चिंचखेड विविध कार्यकारी सोसायटीचे दोन लाख रुपये कर्ज असून मध्यंतरीचे काळात वडील विहिरीत पडल्याने डोक्याला मार लागलयाने त्यांचे वडील कोणतेही काम करू शकत न स त या कारणाने घरची सर्वस्व जबाबदारी दत्तात्रय लभडे यांच्यावर आल्याने व गेल्या चार वर्षांपासून शेतातील सततची नापिकी आणि द्राक्ष बागेत कोणतेच उत्पन्न मिळाली नाही म्हणून त्यांनी द्राक्षबागेवर कुर्हाड लावली होती.

याव्यतिरिक्त उत्पन्नाचे कोणतेही साधन संपत्ती नसल्याने नैराश्यातून गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना दत्तात्रय लभडे यांनी घरातील छताला गळफास घे तला आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी,दोन मुले, सून भाऊ,असा परिवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button