Nashik

अवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार

अवकाळी पाऊस व गारपिठ्मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत द्या- ना.डॉ.भारती पवार

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

नाशिक: संपुर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात वेळोवेळी गारपीट व अवेळी पावसामुळे शेतकपिकांचे / फळपिकांचे, कांदा व द्राक्ष बागांचे, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच गारपीठमुळे पशुधन मृत्युमुखी पडले आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षापासुन कोरोना साथ रोगाचे संकट व सातत्याने होत असलेल्या अवकाळी गारपीठ पावसामुळे शेतकऱ्यांचे कापणीस उभेपिक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी दुहेरी संकटामुळे आर्थिक कोंडीत सापडला आहे. ह्या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा दिलासा मिळावा याकरिता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना पत्र देवून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देणेसाठी रोख स्वरूपात आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली आहे.त्याचबरोबर सद्यस्थितीत महावितरण कंपनीकडुन राबविण्यात आलेली सक्तीने विजबिल वसुली बंद करून विज देयके माफ करणेबाबत शासन स्तरावरून सवलत मिळनेकामी देखील विनंती मागणी केली आहे. तसेच विमा कंपन्यांकडुन शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित विमा कंपन्यांना निर्देष देण्याचे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डॉ.भारती पवार यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button