Nilanga

निलंगा तालुक्यातील बोळेगावात होम कॉरंटाईन होण्याच्या वादातून दोघांचा खून तर आठजणांवर गुन्हा दाखल

निलंगा तालुक्यातील बोळेगावात होम कॉरंटाईन होण्याच्या वादातून दोघांचा खून
तर आठजणांवर गुन्हा दाखल

लक्ष्मण कांबळे

निलंगा
तालुक्यातील बोळेगाव येथे आम्ही उत्तर प्रदेशातून आलो असलो तरीगावातच राहणार शेतात राहणार नाही म्हणून झालेल्या वादातून आज पहाटे अत्यंत जवळचे नातेवाईक असणारे आठ जणांनी घरावर दगडफेक करून चाकुने भोसकून चुलत्या पुतण्याची हत्या केली आहे.कोरोनाचे वातावरण त्यामुळे तुम्ही शेतातच रहा असा अग्रह केल्याचा राग यऊन शेजारचे गावातील नातेवाईकांना बोलावून आठजणांनी हा प्रकार केला आहे.

कासारशिरसी येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे तातेराव बरमदे हे उत्तर प्रदेशातून आले असता सद्या कोरोनाची साथ आहे. तुम्ही घरी थांबू नका शेतात जाऊन रहा असे गावातील नातेवाईक व गावकरी यांनी सांगितले आसता तातेराव बरमदे याने मी गावातच राहणार अशी धमकी देऊन निघून गेला व काल राञी उशिरा बोळेगाव व चांदोरी येथिल नातेवाईकांना एकञीत करून राञौ उशिरा शहाजी पाटील यांचे घरावर दगडफेक करण्यात आली. आरोपी पाटील,अविनाश दत्तू माने,गणेश दत्तू माने, दत्तू रावसाहेब माने सर्व राहणार बोळेगाव व भरत सोळूंके, सचिन भरत सोळूंके,नितीन भरत सोळूंके, बिभिषण सोळूंके राहणार चांदोरी यांनी तातेराव बरमदे गावातच राहतील
बघु कोण काय करते ते? अशी धमकी देत दगडफेक करण्यास सुरूवात केली याच दरम्यान या जमावाने चाकू राॅड काठ्यानी हल्ला केला. यात शहाजी किसन पाटील(५०) व वैभव बालाजी पाटील(२४) या चुलत्या पुतण्याची भोसकून हत्या करण्यात आली.

कोरोना साथ रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून नातेवाईकांनीच गावात न होता शेतात क्वारंटाईन व्हा, असा सल्ला दिला पण हा सल्ला काका पुतण्यास महागात पडला त्यांना प्राण गमवावे लागले. मारेकरी हे मयतांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत.घटनेचे वृत कळताच अप्पर पौलिस अधिक्षक हिम्मत जाधव, उपअधिक्षक निलेश देशमुख, कासार सिरसीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक डमाले यांनी घटना स्थळास भेट दिली. या प्रकरणी का. सि. पोलिसात भादवी ३०२, ३२६ व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपअधिक्षक निलेश देशमुख हे पुढील तपास करित आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button