Maharashtra

सटाणा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेबांच्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला अपंग कल्याण केंद्रात

सटाणा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेबांच्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला अपंग कल्याण केंद्रात

सटाणा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेबांच्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला अपंग कल्याण केंद्रात

सटाणा प्रतिनिधी
   सटाणा पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले व दहिवद गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच श्रीमती सुषमा वासुदेव पाटील यांचा मुलगा चि.आस्तिक चा वाढदिवस हा भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ आँगस्ट रोजी असतो.

सटाणा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेबांच्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला अपंग कल्याण केंद्रात
    सालाबादप्रमाणे साहेबांच कुटूंब मुलांचा वाढदिवस हा सामाजिक कार्यक्रमा सारखाच साजरा करतात व काल हि स्वातंत्र्य दिनाचे सर्व शासकीय कार्यक्रम आटोपून देसले कुटूंब व मित्र परिवार सायंकाळी सटाणा येथील अपंग कल्याण केंद्रात जावून भला मोठा केक अपंग बाळाच्या हातुन कापण्यात आला या वेळी चि.आस्तिक याचे औक्षण हि करण्यात आले, केंद्रातील सर्व अपंग बाळ गोपाळांना केक, कँटबरी देवून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला व देसले परिवारातर्फे अपंग कल्याण केंद्रात जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेबांनी हि परिवारासह अपंग बालकांसोबत जेवण केले जेवन करित असतांना एक अपंग बाळाला दोन्ही हात नव्हते ते पाहून चि.आस्तिक हा त्या बाळाजवळ गेला व त्या बाळाला आस्तिकने स्वतः च्या हाताने पोटभर जेवू घातले. चि.आस्तिक चा वाढदिवस साजरा करतांना अपंग कल्याण केंद्रात काल सायंकाळी अपंग बाळ गोपाळांच्या चेहरे प्रसन्न होते व खुप मोठा जल्लोष हि झाला.
 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button