Mumbai

बिग बॉस मध्ये राखी सावंत च्या नवऱ्याची एन्ट्री..!अखेर राखीच्या नवऱ्याचे झाले दर्शन…

बिग बॉस मध्ये राखी सावंत च्या नवऱ्याची एन्ट्री..!अखेर राखीच्या नवऱ्याचे झाले दर्शन…

मुंबई टेलिव्हिजनवर बिग बॉस १५ हा रिअॅलिटी शो चर्चेत आहे. या शोमध्ये आता तीन वाइल्ड कार्ड एण्ट्री झाल्या आहेत. त्यात रश्मि देसाई, देवोलीना भट्टाचार्य आणि राखी सावंत या अभिनेत्रींचा प्रवेश झाला आहे.राखी सावंतसोबत तिचा पती रितेश देखील बिग बॉसच्या घरात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखीच्या पतीचा चेहरा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. आता अखेर रितेश राखीसोबत बिग बॉसच्या घरात दिसला असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

अखेर राखीचा पती सर्वांसमोर आला आहे. राखी सावंतने जेव्हा रितेशशी लग्न केले तेव्हा ती चर्चेत होती. पण रितेशला आजपर्यंत कुणीही पाहिलेल नव्हतं.अनेकांनी राखीने चर्चेत येण्यासाठी केवळ खोटे लग्न केले आहे असे म्हटले होते. आता बिग बॉसच्या घरात रितेशची एण्ट्री झाली आहे.

जेव्हा अनेकांना राखीचे लग्न रितेश नावाच्या एका उद्योगपतीशी झाल्याचे सांगितले तेव्हा कुणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. अनेकांनी राखी खोटं बोलत आहे असे वाटले. इतकेच काय तर हा एक पब्लिसिटी स्टंट आहे असेही अनेकांनी म्हटले. माझ्या पतीचा चेहरा लोकांना पाहायला मिळाला नाही म्हणून कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता बिग बॉस १५मध्ये धमाल पाहा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button