Aurangabad

प्रगती पेट्रोल पंपाची पाहणी करून मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतली कामकाजाची माहिती

प्रगती पेट्रोल पंपाची पाहणी करून मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतली कामकाजाची माहिती

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सेंट्रल नाका येथील प्रगती पेट्रोल पंपाला आज मंगळवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच पेट्रोल पंपाच्या एकूणच कामकाजाची माहिती घेतली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीने महानगरपालिकेला सुरू करून देण्यात आलेल्या प्रगती पेट्रोल पंपाचे उद्घाटन पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दि. 28 जून 2021 रोजी करण्यात आले. या पेट्रोल पंपला आज मंगळवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भेट देऊन पाहणी केली व कर्मचाऱ्याकडून एकूणच चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली. प्रगती पेट्रोल पंप मुख्य रस्त्यावर असल्याने या पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी वाढत आहे.

महानगरपालिकेच्या वतीने याशिवाय आणखीन चार ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत. कांचनवाडी पैठण रोड, चिकलठाणा लगत बाजार सावंगी बायपास, गरवारे स्टेडियम व जुना हरसुल जकात नाका जळगाव रोड या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे स्वतःचे इंधन विक्री रिटेल आउटलेट सुरू करून या माध्यमातून महानगरपालिकेला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत प्राप्त होईल व महानगरपालिकेचा वाहनासाठी होणारा इंधन खर्च निघेल ,हा यामागचा उद्देश महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button