Chalisgaon

?️ चाळीसगाव, मेहुणबारेतील १२ संशयितांना तपासणीसाठी जळगावला पाठविले धुळे येथे कोरोनाबाधिताचा संपर्कः आरोग्य यंत्रणा अर्लट

चाळीसगाव, मेहुणबारेतील १२ संशयितांना तपासणीसाठी जळगावला पाठविले
धुळे येथे कोरोनाबाधिताचा संपर्कः आरोग्य यंत्रणा अर्लट

चाळीसगावः मनोज भोसले

धुळे येथे कोरोना बाधिताच्या संर्पकात आलेल्या मेहुणबारे येथील तीन तर चाळीसगाव शहरातील ९ अशा १२ संशयितांना तपासणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जळगावी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

मेहुणबारे येथील विठ्ठलवाडी परिसरातील एकाच कुटूंबातील दोन ज्येष्ठ नागरिक व एक मुलगा असे तीन जण धुळे येथे कोरोना बाधिताच्या संर्पकात आले होते. आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी त्यांचे विलगीकरण केले. त्यांना संशयित म्हणून जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

चाळीसगाव शहरातील मालेगाव रोड परिसरात असणा-या वृदावन काॕलनीतील नऊ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांनाही जळगावी पाठविण्यात आले आहे. वृदावन नगरातील माहेर असणारी विवाहिता धुळे जिल्ह्यातील शिरुड येथे राहते. तिही कोरोना बाधिताच्या संपर्कात आली असल्याने तिच्यासह घरातील अन्य आठ जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
तरवाडे येथील सीमाबंदीची पाहणी नुकतीच जिल्हाधिका-यांनी केली आहे. मात्र त्यांची पाठ वळताच ‘सीमाबंदीचे छिंद्रे’ मोकळे झाले का ? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.

चाळीसगाव शहरालगत अवघ्या २०ते२५ किमी अंतरावर नाशिक, धुळे, औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा आहे. येथे कोरोना बाधित मोठ्या संख्येने आढळत असल्याने चाळीसगाव आता यात घेरले गेले आहे. अशी स्थिती झाली आहे. सीमाबंदी अधिक अर्लट करणे आवश्यक असून संशयित आढळल्याने पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button