फैजपूर

मसाका च्या संचालक मंडळातर्फे ऊस लागवडीसाठी ऊस उत्पादकानां आवाहन

मसाका च्या संचालक मंडळातर्फे ऊस लागवडीसाठी ऊस उत्पादकानां आवाहन

सलीम पिंजारी

मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या 42 वर्षापासून अखंडपणे गाळप करीत आहे मात्र सध्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने तसेच मागील वर्षी पाण्याची कमतरता होती त्यामुळे ऊस लागवड कमी झाल्याने गाळपासाठी अत्यंत कमी ऊस उपलब्ध असल्याने व मागील वर्षाचे ऊस पेमेंट, ऊस तोडणी वाहतूक पेमेंट, कामगार पगार, पीएफ या व अशा इतर अनेक देणी थकीत झाल्याने गाळप हंगाम 2019 20 संचालक मंडळाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे नोंदणी केलेला संपूर्ण ऊस जवळच्या मुक्ताई शुगर एनर्जी, मुक्ताईनगर यांना आपल्या कारखान्याच्या सहकार्याने व मुक्ताई शुगर एनर्जी ,मुक्ताईनगर यांच्या तोडणी वाहतूक यंत्रणेने गाळपास पाठवीत आहोत .

मधील काळात कारखान्याच्या वर नमूद परिस्थितीमुळे ऊस उत्पादकांमध्ये नवीन ऊस लागवड करणेबाबत संभ्रमता निर्माण झाल्याने ऊस लागवड अल्पप्रमाणात झालेली आहे. गाळप हंगाम 2020-21 कारखाना स्तरावर किंवा इतर अन्य प्रकारे सुरू करावयाचे झाल्यास ऊस लागवड होणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे संचालक मंडळ सभेने लागवड हंगाम 2019-20 साठी आतापर्यंत झालेल्या ऊसाची व नवीन ऊस लागवड करणे व नोंदणी करण्यासाठी श्री शरद दादा महाजन चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी ऊस उत्पादकांना आवाहन केले आहे

सध्या आडसाली ऊस लागवडीचा कालावधी संपलेला असल्याने 265 या ऊसास कालावधी कमी पडेल व परिपकवता होणार नाही यामुळे टनेज सुद्धा कमी येईल त्यामुळे 265 या जाती पेक्षा नवीन 8005 आणि 10001 या नवीन जातींची ऊस लागवड करणे वर भर द्यावा असेही आवाहन करणेत आले आहे

चेअरमन श्री शरद महाजन , व्हा चेअरमन श्री भागवत पाटील संचालक श्री नरेंद्र नारखेडे ,श्री अरुण दादा पाटील ,श्री नितिन चौधरी कार्यकारी संचालक एस आर पिसाळ उपस्थित होते त्यांनी ऊस लागवडीचे आवाहन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button