Pandharpur

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त “स्वच्छता हिच सेवा” सप्ताहास सुरुवात

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त “स्वच्छता हिच सेवा” सप्ताहास सुरुवात

प्रतिनिधी रफीक आत्तार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पंढरपूर नगरपरिषदे मार्फत “स्वच्छता हिच सेवा” हा सप्ताह राबवण्यात येत आहे. पंढरपूरातील विविध भागात स्वच्छता सप्ताह राबविण्यात येत आहे . रेल्वे स्टेशन, यमाई तलाव व टिळकस्मारक मैदानावर स्वच्छता करत सदर मोहिमेस सुरवात झाली. यामध्ये बस स्थानक, नदी परिसर, नदीपरिसरातील घाट, पुला खालील परिसर, मैदान, पंढरपूरातील उद्यान या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले व पंढरपुरातील नागरिकांनी स्वच्छता हिच सेवा या उपक्रमात मध्ये सहभाग नोंदवुन नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे व सध्या सारखा पाऊस पडत असल्याने शहरांमध्ये डेंगू व मलेरिया सारखा आजार बळावत आहेत यावर मात करण्यासाठी आपल्या घराचा गच्ची व परिसरातील भंगार, टायर,कुंड्या, फ्रिज,कुलर याची नियमित तपासणी करा. यामध्ये पाणी साचल्यास असंख्य डेंगू व मलेरिया डासाची उत्पत्ती होऊ शकते. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी अशी ठिकाणे नष्ट करावी, कोणीही रत्यावर कचरा टाकु नये तो घंटागाडीतच टाकावा व सर्वांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी पंढरपूरामध्ये सर्व भागात दररोज घंटागाडी येत असल्याने आपल्या घरातील कचरा घंटागाडी मध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगळा द्यावा अशा प्रकारची काळजी घेत आपण आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवुयात असे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या लढाईत आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलेले आहे यापुढे सुद्धा असेच सहकार्य करून शहर स्वच्छ व कोरणा मुक्त राहील याकडे लक्ष देऊया पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणारे स्वच्छता सप्ताह मध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांनी सांगितले.सदर प्रसंगी नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,आरोग्य सभापती विवेक परदेशी, गटनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक कृष्णा वाघमारे, नरेंद्र डांगे,धर्मराज घोडके,नवनाथ रानगट, आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button