Kolhapur

राष्ट्रवादीचा युवा शिलेदार संग्रामदादा*

*राष्ट्रवादीचा युवा शिलेदार संग्रामदादा*

कोल्हापूर प्रतिनिधी-सुभाष भोसले

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भुदरगड तालुक्यातील एक हसतमुख व्यक्तिमत्व, यशवंत असं नेतृत्व !
लहानपणा पासुन संघर्षातुन निर्माण झालेल, सहकारातुन राजकारणात आलेल स्वच्छ निष्कंलक व्यक्तीमत्व पण तितकंच वैचारीक विचारधारा असणार नेतृत्व, शालेय जीवनापासुन आज अखेर न थांबता न थकता समाजासाठी आपल्या लोकांसाठी चंदनासारख काम करणारे नेतृत्व ! या माणसांकडे पाहुन प्रश्न पडतो की इतकी उर्जा येतेच कोठुन? मग त्याच उत्तर मिळते *अफाट जनसंपर्क*…!!
राजकारणामध्ये खुप लोक पाहीलेत आज शब्द देतात अन् विसरून जातात पण दादा हे व्यक्तीमत्व खुप वेगळे आहे .दिलेल्या शब्दाशी कधीच तडजोड केली नाही .मी दादांचे राजकीय जीवन मी खुप जवळुन पाहीले यश पचवणारा आणि अपयश आले तरी खिळाडुवृत्तीने स्विकारणारा हा अवलिया वेगळाच आहे. राजकारण करत असताना विरोधकावर टिका करावी लागते असा अलिखीत नियम आहे, पण दादा याला अपवाद आहेत कधीच कोणावर टिका टिप्पणी न करता शाश्वत विकासावर विश्वास ठेऊन आपल काम ते गेली अनेक वर्ष करत आहेत .
आदरणीय मा. आ. के पी पाटील साहेब व राष्ट्रवादी पक्ष एकनिष्ठ राहुन त्यांनी आपली स्वच्छ प्रतिमा तयार केली आहे. आपल्या कामाचा कधीच कांगावा केला नाही कधी प्रसिध्दीच्या झोतात आले नाहीत. त्यांच्या जवळ राजकीय चातुर्य प्रचंड आहे. सामाजिक राजकीय जीवनात आपली बांधिलकी ही समाजातील बालक, विद्यार्थी, महिला, युवकांपासुन जेष्ठ वयोवृध्द लोकांशी ठेऊन त्यांच्या हृदयात अढळस्थान निर्माण केले आहे.
माझ्या राजकीय सामाजिक व्यावसायिक जडणघडणीत कायम ठामपणे मार्गदर्शक, गुरुस्थानी आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस भुदरगड तालुका अध्यक्ष ही जबाबदारी पार पाडत असताना दादांच्या रुपाने एक मोठा आधार पाठीशी असल्याने कधीच काही समस्या निर्माण झाली नाही. आम्हा सर्व युवक कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभा प्रमाणेच आपले कार्य आहे. आपली साथ सोबत नेहमीच प्रेरणादायी आहे. अशा हसतमुख, अजात शत्रु नेतृत्वाचा कार्यकर्ता, सहकारी, मित्र असल्याचा अभिमान वाटतो. माझ्या आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस भुदरगडच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व तमाम युवक कार्यकर्त्यांच्या वतीने आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा !
*दादा, आप जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार, वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा अशी प्रतिक्रिया
संतोष सर्जेराव मेंगाणे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भुदरगड तालुका अध्यक्ष यांनी व्यक्त केली त्याच्यासोबत शुभेच्छा देणेसाठी सुनिल् देसाई,सुनिल तांबेकर,सागर बिरंबोळे,अशोक हजारे,युवक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button