Amalner

? Breaking News…अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आणि सहकाऱ्यांची धडक कार्यवाही..बस स्थानका समोर 15 वाहने केली जप्त

? Breaking News…अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आणि सहकाऱ्यांची धडक कार्यवाही..बस स्थानका समोर 15 वाहने केली जप्त..

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जनता शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना मुळीच सहकार्य करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासकीय अधिकारी आपआपल्या परीने आणि पद्धतीने चोख व्यवस्था आणि बंदोबस्त ठेवण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. परंतु जनतेकडून मात्र त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही असे आढळून येते आहे.? Breaking News...अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आणि सहकाऱ्यांची धडक कार्यवाही..बस स्थानका समोर 15 वाहने केली जप्तत्यामुळे अमळनेर चे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आता कायदा मोडणाऱ्या,विनाकारण फिरणाऱ्या,144 कलमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी,चारचाकी गाड्यांची चालविणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी सुरू केली आहे. या अनुषंगाने आज सकाळी 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंत 15 दुचाकी विनाकारण फिरणारी वाहने बस स्थानका जवळ जप्त करण्यात आली आहेत.पुढील कार्यवाही सुरू असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे कोणीही विनाकारण घरा बाहेर पडू नये.शासनाला मदत करावी अशी जाहीर विनंती अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी केली आहे.? Breaking News...अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आणि सहकाऱ्यांची धडक कार्यवाही..बस स्थानका समोर 15 वाहने केली जप्त

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button