Jalgaon

? दंगल राजकारणाची..खडसेंच्या पक्षांतराचे बाळंतपण कुठे अडलं आहे..?कभी हा कभी ना मध्ये कोणती(पदाची)खिचडी शिजते आहे..?

? दंगल राजकारणाची..खडसेंच्या पक्षांतराचे बाळंतपण कुठे अडलं आहे..?कभी हा कभी ना मध्ये कोणती(पदाची)खिचडी शिजते आहे..?

राजीमना दिला नसल्याचे स्पष्ट..कार्यकर्ते एव्हढे उत्साही का..?खडसे त्यांना का “खडसावत” नाहीत..?

प्रा जयश्री दाभाडे

जळगांव जिल्ह्यात सध्या एकच चर्चा गेल्या 15 दिवसांपासून होत आहे ती म्हणजे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे पक्षांतर…परंतु अजूनही या संदर्भातील चित्र स्पष्ट होत नसल्याचे दिसुन येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून बाळंत पणाला गेलेले हे पक्षांतर प्रकरण नेमकं कुठे अडलं आहे..? का अडलं आहे आणि नेमकी काय स्थिती आहे असे प्रश्न जन सामान्यांना पडले आहेत.

माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षाचे अत्यन्त जुने विश्वसनीय मंत्री म्हणून ओळखले जातात. परंतु मागच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी चे मुख्य व योग्य दावेदार असतांना पक्षाने त्यांना डावलून देवेन्द्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद बहाल केले. याचवेळी भारतीय जनता पक्षावर खडसे नाराज झाले होते. वास्तविक त्याच वेळी अनेकांना वाटले होते की खडसे भारतीय जनता पक्ष सोडतील परंतु तसे न होता खडसे यांनी आपली पक्षाशी असलेली निष्ठता दर्शवत इतके दिवस पक्षांतराचा निर्णय घेतला नाही.

आता मात्र गेल्या 15 दिवसांपासून खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेशित होण्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. एव्हढेच नव्हे तर खडसे यांनी अजूनही याबाबतीत कोणतेही विधान केलेले नाही. आज त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे.स्वतः खडसे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपल्याकडे राजीनामा आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.कार्यकर्ते मात्र खूप जोरदार पणे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल चुकीच्या बातम्या पसरवत आहेत.

आता हे पक्षांतराच नाटक किती दिवस सुरू राहणार आहे? खडसे कार्यकर्त्यांना खडसावत का नाहीत? हे बाळंत पण का अडलं आहे?बंद दरवाजा आडून कोणत्या चर्चा होत आहेत? नेमकं काय हवं आहे? आणि काय दिल जाणार आहे? राजकीय वर्तुळात किती बदल घडतील? वरिष्ठ पातळीवर कोणती खलबते सुरू आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button