Ahamdanagar

कै. हरिभाऊ नांगरे यांचे सत्यसोधक पध्दतीने प्रथम स्मृतिदिन संपन्न

कै. हरिभाऊ नांगरे यांचे सत्यसोधक पध्दतीने प्रथम स्मृतिदिन संपन्न

राहुल खरात

नगर–फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल सोशल फाउंडेशन चे वतीने कै. हरिभाऊ दशरथ नांगरपाटील यांचे दि.2जाने.2020 रोजी शेवगांव येथे सकाळी 10 वाजता नांगरे मळ। येथे महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले पध्दतीने पहिला स्मृतिदिन व सावित्रिमाई फुले यांची 189 वी जयंती साजरी करण्यात आली.या वेळी सुरुवातीला महात्मा फुले आणि सावित्रिमाई फुले यांच्या अर्ध पुतळयास महात्मा फुले साहित्य साधने प्रकाशन समिती ,महाराष्ट्र शासन,चे सदस्य रघुनाथ ढोक व सामाजिक कार्यकर्त्यां आशा ढोक यांचे शुभहस्ते हार अर्पण करून रघुनाथ ढोक यांनी सत्याचा अखंडाचे गायन केले. या प्रसंगी महेश महाराज हरवणे यांचे कीर्तन झाले.त्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधन करताना आई वडिलांची योग्य सेवा करा,नेहमी सत्कार्य करावे असा कानमंत्र देऊन संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कांदा मुळ। भाजी अवघि विठाई माझी अभंगाने सांगता करून श्रर्माने नावलौकीक़,अर्थार्जन करा असे म्हंटले. या वेळी शिवचरित्र ह.प.भ.विष्णु महाराज अंतरकर, गायनाचार्य दिलीप महाराज आणि अंकुश महाराज गायकवाड़,मृदुगसम्राट आदिनाथ महाराज गलधर, ह.भ.प.संजय महाराज बिलवाल यांनी मदत केली तर श्री सदगुरू भीमसिंह महाराज गुरुकुल ,शेवगांव यांच्या बाल गोपालांनी टाळ।ची सूंदररित्या साथ दिली. यावेळी माजी सरपंच अशोक डाके,सचिन शेळके, संजय गवळी,योगेश डाके,कुणाल कांबळे, शुभंम नांगरे उपस्थित होते.या कार्यक्रमानिमित्त भाऊ हरिभाऊ नांगरे मिश्री यांनी दत्तमंदिर वृद्धाश्रम, शेवगांव येथे अन्नदान साठी रोख 2001 रु.कै. हरिभाऊ नांगरे यांचे स्मरणार्थ देंणगी दिली.यावेळी सावित्रिमाई यांचे जयंतीला अनुसरून रघुनाथ ढोक म्हणाले की महात्मा फुले आणि सावित्री माई यांनी सामाजिक कार्य करून आपणास मानव सेवा हीच खरी ईस्वर सेवा आहे असे सांगितले असून आपन सर्वानीच अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजलि ध्या तसेच आपल्या घरातील विवाह सारखे अनेक कार्य सत्यसोधक पध्दतीने करून, श्रम, पैसा, वेळ यांचे योग्य वापर करा असा मौलिक सल्ला दिला. या प्रसंगी सर्व समाज मोठा संख्याने उपस्तीत होता आणि कीर्तनकार,महाराज,पाहुने मंडळीसह सर्वानीच अन्नदानाचा आस्वाद घेतला.मोलाचे सहकार्य फुले एज्युकेशन व नांगरे कुटुबियानी केले तर सूत्रसंचालन कॉमरेड संजय भगवान नांगरे केले आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते केडगांव चे कापरे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button