Pandharpur

DVP चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

DVP चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक मा.श्री.अरुण पवार साहेब व तहसीलदार मा.श्री. विवेक साळुंखे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

रफीक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : ग्रामीण युवकांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण त्यांना यथायोग्य संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. संधी उपलब्ध करून देण्याचा मूळ हेतू केंद्रस्थानी ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात प्रसिद्ध असलेल्या पारंपरिक क्रिकेट आदी खेळांच्या व्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे हा देखील यामागील हेतू आहे. जितके जास्त क्रीडाप्रकार प्रसिद्ध होतील तितक्या अधिक संधी उपलब्ध करून देता येतील अशी व्यापक भूमिका यामधे आहे.

यापूर्वी १९८३ मध्ये पंढरपूर येथे अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर आजच अशी स्पर्धा आयोजित होत आहे त्यामुळे पंढरपूर येथील क्रीडाप्रेमी नागरिक आणि युवक अत्यंत आनंदित झाले आहेत. पांडुरंगाच्या पावन चरण स्पर्शाने पावन झालेल्या आणि भक्तांची मांदियाळी असलेल्या आपल्या पंढरपूरला “क्रिडेची पंढरी” देखील ओळख मिळावी अशी माझी मनीषा आहे. ही स्पर्धा त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मा.श्री.साईनाथ भाऊ अभंगराव, मा.श्री.महादेव धोत्रे, मा.श्री.संजयबाबा ननवरे, मा.श्री. विशाल मर्दा शेठजी, पांडुरंग बोडके, मा.श्री.भालचंद्र देवधर सर, मा.श्री.डॉ.आरिफ बोहरी, मा.श्री.विक्रमसिंग भोसले, मा.श्री.अर्जुन पवार, फुटबॉल प्रशिक्षक मा.श्री.किरण जाधव सर, मा.श्री.सुधीर (भाऊ) अभंगराव, मा.श्री.युवराज मुचलंबे, श्री. ओंकार जोशी, श्री. ओंकार वाळूजकर, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य मा.श्री.संजय अभ्यंकर, विठाई फुटबॉल क्लबचे सर्व सदस्य, मान्यवर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

DVP चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button