कोर पावली येथे शिक्षकांना सत्कार
हिंगोणा ता यावल ( बातमिदार )शब्बीर शेख
जिप मराठी मुलांची शाळा कोरपावली ता. यावल जि. जळगाव येथे शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला तसेच शालेय पोषण आहार ( कडधान्य वाटप) करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी मा. सरपंच आणि काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष मा जलीलदादा पटेल होते तसेच त्यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले आणि आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यध्यपक धनराज कोळी, उपशिक्षक मुस्तफा तडवी, शिक्षक जाकीर शाह, रमेश काळे, निवृत्ती भिरुड यांचा ग्राप कोरपावली, शालेय वेवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, तुळशीदास कोळबे, इस्माईल तडवी, समिती अध्यक्ष जुम्मा तडवी, उपाध्यक्ष हमीद पटेल, समीर तडवी, अकिल तडवी, मुबारक तडवी,ग्राप कर्मचारी किसन तायडे, विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.






