Amalner

Amalner: माझी वसुंधरा आंतर नगरपालिका क्रिकेट स्पर्धेत चोपडा संघ विजयी तर शेंदूर्णी संघ द्वितीय अमळनेर तिसऱ्या स्थानावर…!

Amalner: माझी वसुंधरा आंतर नगरपालिका क्रिकेट स्पर्धेत चोपडा संघ विजयी तर शेंदूर्णी संघ द्वितीय अमळनेर तिसऱ्या स्थानावर…!

अमळनेर माझी वसुंधरा अंतर्गत झालेल्या जिल्ह्यातील आंतर नगरपालिका क्रिकेट स्पर्धेत अमळनेर नगरपरिषदेने तृतीय बक्षीस पटकावले. तर चोपडा नगरपालिका संघाने विजेते, शेंदूर्णी नगरपंचायतीने उपविजेतेपद मिळवले.
माझी वसुंधरा अंतर्गत गेल्या तीन दिवसांपासून प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा सुरू होत्या. या झालेल्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत भडगाव (गिरणा वारीयर्स), पाचोरा (सुपर स्टार), पाचोरा (डीएन पाटील संघ), अमळनेर (भूमी), अमळनेर (जल), फैजपूर (नारखेडे), फैजपूर (दराडे), पारोळा (पीएमसी), एरंडोल (आरोग्य), एरंडोल (ग्रीन), चोपडा (आरोग्य), चोपडा (स्टाफ), धरणगाव, वरणगाव
(वारीयर्स), जामनेर, शेंदूर्णी, नशिराबाद आदी संघांनी भाग घेतला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाययक आयुक्त जनार्दन पवार यांच्या हस्ते प्रथम चोपडा संघाला २१ हजार रोख व चषक असे बक्षीस देण्यात आले. द्वितीय शेंदूर्णी संघाला माजी नगराध्यक्ष विनोद लांबोळे यांच्याहस्ते ११ हजार रोख आणि चषक
असे बक्षीस तर तृतीय अमळनेर संघाला ७ हजार व चषक बक्षीस देण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, वरणगाव मुख्याधिकारी समीर शेख, एरन्डोल मुख्याधिकारी विकास नवाळे, शेंदूर्णी मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सावदा मुख्याधिकारी किशोर चव्हाण, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी, अभियंता सत्येम पाटील, अभियंता अमोल भामरे, दिगंबर वाघ, विकास बिरारी,आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिहाडे, हैबत पाटील प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.
उत्कृष्ट बॉलर ऋषी कलोसे (अमळनेर), उत्कृष्ट बॅट्समन मयूर पाचोरे, मॅन ऑफ द सिरीज मयूर पाचोरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चंद्रकांत माळी, उत्कृष्ट विकेट किपर योगेश बैसाणे याना चषक देऊन गौरव करण्यात आला. गोल्डी बिऱ्हाडे यांनी कॉमेंट्री केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button