kalamb

वीज बिल माफीसह वाढीव बिलाच्या संदर्भात मनसेने महावितरण कार्यालय फोडले

वीज बिल माफीसह वाढीव बिलाच्या संदर्भात मनसेने महावितरण कार्यालय फोडले

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब- सध्या महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना व लॉकडाऊन मुळे जनता त्रस्त आहे त्यातच वाढीव लाईट बिल येणे,अवेळी जाणारी वीज,महावितरण चा न लागणारा फोन अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे..

‘वीज बिल माफ करा’ या मागणीसाठी साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कळंब शहरातील महावितरण कार्यालयात तुफान राडा केला आहे.यावेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत महावितरण कार्यालयातील केबिन आणि फर्नीचरची तोड़फोड़ केली आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हैरान झालेले आहेत. यातच रोजगार नसल्याने जगणे अवघड झाले आहे. सतत निवेदन देऊनही शासन आणि महावितरणने दुर्लक्ष केल्याने केले हे आंदोलन केल्याच्या भावना संतप्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत

.दरम्यान पोलिसांनी मनसेचे तालुकाध्यक्ष सागर बारकुल, शहराध्यक्ष अमोल राऊत यांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button