Chimur

चिमूर तालुक्यातील अवैधरित्या रेती तस्करीच्या व्यवसायावर आळा घालावा युवक काँग्रेस तालुका ची मागणी

चिमूर तालुक्यातील अवैधरित्या रेती तस्करीच्या व्यवसायावर आळा घालावा युवक काँग्रेस तालुका ची मागणी

चिमूर तालुक्यातील अवैधरित्या रेती तस्करीच्या व्यवसायावर आळा घालवा श्री.प्रशांतभाऊ डवले युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष चिमूर यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय चिमूर यांना दिले निवेदन……

ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर तालुक्यातील अवैधरित्या रेती तस्करीच्या व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात रात्रौ-दिवस जोमाने सुरू आहे.याकडे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे पुरेपूर दुर्लक्ष केलं जात असून तलाठी व मंडळ अधिकारी यांचेच आशीर्वादाने सदरचा अवैधरित्या रेती तस्करीचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र मागील 1 वर्षांपासून दिसून येत आहे.महसूल विभागाकडून माहिती घेतली असता रेतीघाटनेचे लिलाव अद्यापही झालेले नाही तरी सुद्धा अवैधरित्या रेतीची तस्करी केली जात आहे.याबाबत वृत्तपत्रांमध्ये अनेकवदा बातम्या प्रकाशित होऊन सुद्धा या अवैधरित्या रेती तस्करीच्या व्यवसायावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न होता थातूरमातूर चौकशी करून राजकीय तथा वैयक्तिक संबंध जोपासून अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या व्यावसायिकांना सहकार्य दिले जात आहे.आत्ताच नव्याने चिमूर शहरामध्ये लावण्यात आलेले c.c.t.v कॅमेऱ्याची पळताळणी करावी व आमच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या निवेदनानुसार जर का सदरची बाब खोटी ठरली तर आमच्यावर योग्य ती कार्यवाही पण आपण करू शकता असे विश्वासजनक शब्दात श्री.प्रशांतभाऊ डवले यांनी श्री.उपविभागीय अधिकारी चिमूर यांना सांगण्यात आले.चिमूर तालुक्यातील अवैधरित्या रेती तस्करीच्या व्यवसायावर आळा घालावा युवक काँग्रेस तालुका ची मागणीआणि त्या cctv कॅमेरामध्ये जर का रेती तस्करी केल्याचे आढळून आले तर त्या रेती तस्करी करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर स्वरूपाची कार्यवाही करावी.असे सांगण्यात आले.त्याचप्रमाणे रेती तस्करीमूळे शासनाच्या तिजोरीत पैसे न जाता थेट तस्करी करणाऱ्यांच्या घरात पैसे जात आहे व यामुळे शासनाच्या महसूल विभागाचे नुकसान होत असून सुद्धा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्षित केल्याचे दिसून येत आहे कारण हे सर्व त्यांचेच आशीर्वादाने तर सुरू नसावं असे पण प्रशांतभाऊ डवले यांनी निवेदन भेटी दरम्यान उपविभागीय अधिकारी साहेब यांना सांगितलं.
या सर्व मुद्यांवर चर्चा करून निवेदन देऊन सांगण्यात आले की जर हा रेती तस्करीचा प्रकार थांबला नाही व तस्करी करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर स्वरूपाची कार्यवाही झाली नाही तसेच त्या वाहनाद्वारे ही रेती तस्करी करण्यात येते त्या वाहनांना जप्ती केली नाही तर येत्या 8 दिवसांमध्ये युवक काँग्रेस चिमूर यांचे मार्फत व *युवा नेते श्री.माननीय सतिषभाऊ वारजूकर गटनेता जि.प.चंद्रपूर, चिमूर विधानसभा सामन्वयक* यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा तालुका युवा अध्यक्ष श्री.प्रशांतभाऊ डवले यांनी आपल्या मुलाखती दरम्यान प्रशासनाला दिला.चिमूर तालुक्यातील अवैधरित्या रेती तस्करीच्या व्यवसायावर आळा घालावा युवक काँग्रेस तालुका ची मागणीनिवेदन देतांना श्री.प्रशांतभाऊ डवले अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी चिमूर, श्री.अमितजी मेश्राम कार्यकर्ता युवक काँग्रेस तालुका चिमूर, श्री. मंगेशजी रंदये कार्यकर्ता युवक काँग्रेस तालुका चिमूर, श्री. सचिनजी धारने कार्यकर्ता युवक काँग्रेस तालुका चिमूर, श्री.बादलजी रामगुंडे कार्यकर्ता युवक काँग्रेस तालुका चिमूर, श्री.प्रफुलजी डांगे कार्यकर्ता युवक काँग्रेस तालुका चिमूर, श्री. अविनाशजी पाटील कार्यकर्ता युवक काँग्रेस तालुका चिमूर, श्री. विलासजी मोहिणकर, श्री. जावेदजी पठाण, श्री. चेतनजी शंभरकर युवा काँग्रेस कार्यकर्ता चिमूर तसेच ईतर युवक काँग्रेस कार्यकर्ते यांचे समवेत श्री.उपविभागीय अधिकारी चिमूर यांना देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button