गौरी गणपती सणासाठी मनसेची मदत
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर गौरी गणपती सणाच्या निमित्ताने मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी गरीब व गरजू कुटुंबाना आज जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले.मनसेच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना ऐन कोरोनाच्या संकट काळात दिलासा मिळाला आहे.
यावर्षी कोरोनाचे मोठे संकट आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने प्रथमच यंदा प्रत्येक घरोघरी जावून गणेशमूर्ती मोफत दिल्या. शहरात जवळपास 9 हजाराहून अधिक घरी त्यांनी गणेशमूर्ती दिल्या आहेत. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केले. कोरोनामुळे अनेक मजूर आणि गरीब कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत. अशा वेळी त्यांच्या ही घरी गौरी गणपतीचा सण आनंदाने साजरा व्हावा यासाठी मनसेेचे नेते दिलीप धोत्रे यांनी गूळ, साखर,गव्हू,तांदुळ,दाळ अशा विविध वस्तूंचे मोफत वाटप केले. आज त्यांनी शहरातील गरीब व गरजू सुमारे दोनशेहून अधिक कुटुंबाना फराळसाठी लागणार्या वस्तूंचे वाटप केले.मनसेेनेचे दिलीप धोत्रे यांनी लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून शहर व तालुक्यातील अनेक गरीब व गरजू लोकांना मदत केली आहे. गौरी गणपती सणाच्या काळात देखील दे गरीब लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची आणि त्यांच्या दातृत्वाचे सर्वच स्तरातून कौतुक आणि स्वागत केले जात आहे. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, नागेश इंगोले,आकाश बंदपट्टे, वैभव इंगोले, लालासाहेब आवताडे आदी उपस्थित होते.






