Aurangabad

आदिवासी महिलेवर अत्याचार करणा-या नराधामास अटक करा, बिरसा क्रांती दलाची मागणी

आदिवासी महिलेवर अत्याचार करणा-या नराधामास अटक करा, बिरसा क्रांती दलाची मागणी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : आदिवासी भिल्ल समाजाच्या महिलेवर जबरदस्तीचा प्रयत्न करत जातीवाचक शिवीगाळ करणा-या आरोपींवर अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी केशव पवार जिल्हाध्यक्ष औरंगाबाद बिरसा क्रांती दल यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पैठण जिल्हा औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात लोहगाव येथील पैशाच्या माजावर एक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने भिल्ल समाजाच्या महिलेवर खुप दिवसांपासुन वाईट नजर व महिलेने विरोध केला असता तिला व तिच्या पतीला‌ कित्येकदा बाहेरचे गुंड लोक आणून घरात शिरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली होती.सदर आदिवासी महिला ही निवडुंगे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील आहे.या निंदनीय घटनेचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो.
आदिवासी समाजाच्या लोकांवर दिवसेंदिवस अन्याय व अत्याचार होत असल्याच्या घटना वाढत आहेत. म्हणूनच अशा निंदनीय गैरप्रकार करणा-या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. तरी निवडूंगे तालुका पाथर्डी येथील आदिवासी भिल्ल महिलेवर अत्याचार करणा-या आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी.अशी मागणी केशव पवार जिल्हाध्यक्ष औरंगाबाद बिरसा क्रांती दल यांनी पोलीस विभागाकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button