आरोग्य कर्मचार्यना टोप्या देऊन संघटनेने जपली बांधीलकी
सुरगाणा,विजय कानडे
कोरोनाने नाशिकच्या ग्रामीण भागातही हातपाय पसरविल्याने आरोग्य यंत्रणे समोर मोठे आव्हान उभे आहे.सुरणाग्यासारख्या अतिदुर्गम भागात कोरोनाचा कहर रोखण्याचे शिवधनुष्य आरोग्य कर्मचारी करीत आहे.नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवतांना स्वसंरक्षणासाठी शासनाने काही साहीत्य पुरविले.पण तळणार्या सुर्याच्या उन्हाचा तडाखा या कर्मचार्यानां सहन करावा लागतो.सैनिक म्हणुन लढा देणार्या या कर्मचार्यांचे उन्हापासुन संरक्षणासाठी आरोग्य कर्मचारी संघटना पुढे येत बांधीलकी जपली आहे.संघटनेचे कार्याध्यक्ष अबुनाना शेख यांच्या संकल्पनेतुन सुरगाण्यातील सुमारे दीडशे कर्मचार्याना टोप्याचे वाटप करण्यात आले आहे.टोप्यामधुन सावली मिळाल्याने कर्मचार्याना सव्हेक्षण करतांना सावली व धीर मिळाला आहे.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील आरोग्य कर्मचार्यानी व्रर्जमुठ बांधली आहे.सकाळ पासुन आरोग्य सेवक,सेविका या कार्यक्षेत्रातील घराचे सर्व्हेक्षण करतात.जीवाची काहीली होणार्या उन्हात त्यांचे सर्व्हेक्षण सुरू असते.सुरगाणा आरोग्य कर्मचारी संघटनेने कर्मचार्याचा उन्हापासुन बचाव करण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला.सुरगाण्याचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार,तालुका आरोग्य अधिकारी रणवीर यांच्या हस्ते कर्मचार्याना टोप्याचे वितरणचा शुभारंभ पळसन आरोग्य केद्रांत करण्यात आले.
कार्याध्यक्ष अबु शेख यांनी या सकंल्पने बाबत सांगीतले की,जीवाची बाजी लावुन सुरगाणा तालुक्यातील आरोग्य कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहे.त्यांचे उन्हापासुन संरक्षण व्हावे हा टोप्या वितरणा मागील उद्देश आहे.शिवाय टोप्याच्या दर्शनीभागात आरोग्य सैनिक असा मचकुर लिहीला आहे.त्यामुळे मास्क असल्याने चेहरा झाकलेला असला तरी टोपी वरील मचकुरामुळे आरोग्य कर्मचारी असल्याचे नागरिकांच्या लक्षात येते.
गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले.कर्मचार्याचे प्रश्न सोडविण्या बरोबर त्यांची वैयक्तीक काळजीही संघटना घेत असल्याचे गौरवोद्रगार त्यांनी काढले.यावेळी तालुकाध्यक्ष सिताराम भोये,जीवलीताई पवार,देशमुख,आरिफ सैय्यद,शीतल पाटील आदी उपस्थित होते.






