Indapur

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा.”मी पुन्हा येईन”वरुन काढली खोड.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा.”मी पुन्हा येईन”वरुन काढली खोड.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:इंदापूर तालुक्यातील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ओझरे व गिरवी बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ फोडून सोमवार दि.०९ रोजी सकाळी करण्यात आला. यावेळी “मी पुन्हा येईन,पुन्हा येईन” असे न म्हणता आम्ही परत या ठिकाणी दुरुस्तीच्या कामासाठी नारळ फोडण्यासाठी येईन असे म्हणालो होतो. म्हणूनचं मी आज या ठिकानी नारळ फोडायला आलो असे म्हणत भारतीय जनता पार्टीला अर्थात देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.

इंदापूर तालुक्यातील ओझरे,गीरवी व माळशिरस तालुक्यातील तांबवे, सवतगव्हाण, गणेशगांव या मुख्य गावांना जोडणारा नीरा नदीवर असणार महत्वाचा बंधारा मागील पावसाळ्यात नीरा नदीला आलेल्या पुरामध्ये पाण्याच्या अतिदाबाने तुटला गेल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला होता. शाळकरी विद्यार्थ्यांनाही जीवघेणा प्रवास यावरून करावा लागत होता. अखेर त्याच्या दुरूस्तीला मंजुरी मिळाली असून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते याचे भुमीपुजन करण्यात आले.

दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, या भागातील सर्वच नागरिकांनी मला विधानसभा निवडणूकित उत्कृष्ट मताधिक्य मला दिले आहे.या सर्वांचे मी आभार मानतो. या बंधा-यावरुन प्रवास जीवघेणा बनला होता. शाळकरी मुलांना प्रवास करणे जिखरीचे बनले होते.निसर्गाने ही चांगली साथ दिल्यामुळेच हे बंधारे पाण्याने खचून तुटून गेलेले आहेत. याचप्रमाणे राजकारणात नेहमी चढ-उतार होत असतात. असे म्हणतं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांवरही बंदा-याचा दाखला देत भरणे यांनी निशाना साधला. लोकांमध्ये जाऊन काम करायचे असते. कामासाठी प्रयत्न करीत जनतेचा विश्वास टिकवणे हे ही महत्त्वाचे असते. मतदार बंधूंनी मला निवडून देऊन आमदार करून मंत्रालयात पाठवले येणाऱ्या तीन वर्षाच्या काळामध्ये तालुक्यांमध्ये कोणतीच रस्त्याच्या कामाची अडचण ठेवणार नाही असा विश्वास ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थितांना दिला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे,दत्तामामा घोगरे, नवनाथ रुपनवर, डॉ.शशिकांत तरंगे,नागेश गायकवाड, सोमनाथ मोहिते, अशोक बळते, बबन बोडके,श्रीकांत बोडके,रमेश मगर,संतोष सुतार,समाधान बोडके, दिलीप बोडके,नवनाथ रुपनवर,बाळासाहेब पडळकर,नरहारी काळे, डाँ.सिद्धार्थ सरवदे, सुनील पालवे, विठ्ठल पवार, प्रताप पालवे,शोभा मोहिते,गोवींद सुळ,नाता रुपनवर,बाळासाहेब घाडगे, नवनाथ मोहिते,कैलास बंडगर,हनुमंत गायकवाड, विलास सुळ,पोपट कोरे,पांडुरंग शिरसागर, संतोष शिरसागर,प्रवीण बोडके,गोपाळ नरुटे यांसह पिंपरी, गिरवी, नरसिंहपूर, टणु, ओझरे, गोंदी, लुमेवाडी,सराटी, गणेशवाडी,बावडा या विविध भागातून विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button