पंढरपुरातील रामकृष्णहरी वृध्दाश्रमातील वृध्दांना मनसेची मदत
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर,ता.22 ,, येथील वृध्दाश्रमाला अनुदान मिळत नसल्याने येथे राहणाऱ्या वृध्दांची परवड सुरु आहे.सामाजिक संस्था आणि वैयक्तीक देणगीदारांनी दिलेल्या मदतीवरच येथील वृध्दांची जेवणाची व्यवस्था केली जाते. दरम्यान कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. याच काळात येथील वृध्दांना मदतीची अधिक गरज आहे. हीच गरज ओळखून मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी येथील रामकृष्ण हरी वृध्दाश्रमातील वृध्दांना आज जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. शिवाय एक महिना पुरेल इतके अन्नधान्य ही दिले. येथील वृध्दाश्रमाला सामाजिक संस्थांनी व दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन दिलीप धोत्रे यांनी या निमित्ताने केले आहे.
कोरोनामुळे जसा सर्वसामान्य लोकांना फटका बसला आहे. तसा इतरांच्या मदतीवर अवलंबून असेल्या अनेक सामाजिक संस्थां आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांनाही बसला आहे. निराधार आणि निराश्रीत वृध्दांसाठी रामकृष्ण हरी वृध्दाश्रम राहण्याची व जेवणाची सोय केली आहे,निराधार आणि निराश्रीत वृध्दांसाठी रामकृष्ण हरी वृध्दाश्रम सुरु करण्यात आले आहे. परंतु मागील अनेक वर्षापासून या वृध्दाश्रमाला शासकीय अनुदान मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे येथील वृध्दांची परवड सुरु आहे.इतर वेळी सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी दिलेल्या मदतीवर येथील लोकांची सोय केली जाते. सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे देणगीदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या वृध्दांची परवड सुरु आहे. त्यांना मदतीची गरज निर्माण झाली आहे. त्यांची ही गरज ओळखून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज येथील वृध्दाश्रमातील वृध्द पुरुष व महिलांसाठी जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर, पोहे, दाळ, आंबे जेष्ठ पत्रकार अभय जोशी आणि सौ मधुरिताई जोशी यांच्या उपस्थितीत वाटप केले. एक महिना पुरेल इतके अऩ्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू संस्थेचे व्यवस्थापक सौ जया टेकाडे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मसनेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड,सहकार सेनेचे अध्यक्ष कृष्णा मासाळ ,उपप्रमुख महेश पवार,सागर घोडके, ओंकार कुलकर्णी, समाधान दुबल आदी उपस्थित होते.






