Pandharpur

सम्यक क्रांती मंच च्या उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा…

सम्यक क्रांती मंच च्या उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा…

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरामध्ये खाजगी नामवंत हॉस्पिटल कडून खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणाऱ्या पंढरपुरातील लाईफलाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल विरोधात सम्यक क्रांती मंच यांचेवतीने आयोजित केलेले माननीय प्रशांत लोंढे यांचे अामरण उपोषणास आज दिनांक ०९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात झाली. या उपोषणास विविध सामाजिक संघटनांचा तथा राजकीय पदाधिकारी यांचा पाठिंबा वाढत असून या प्रकरणी जनआंदोलन उभारण्याविषयी त्यांच्याकडून आश्वासन दिले जात आहे. त्याची सुरुवात म्हणून विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय उपविभागीय दंडाधिकारी यांना परस्पर निवेदने देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज दुपारी ०१:४५ वाजता माननीय उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी माननीय जिल्हाधिकारी (गृह) यांना सदरचे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे सम्यक क्रांती मंच चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. प्रशांत लोंढे यांना माहितिस्तव दिलेल्या पत्रात कळविले आहे. याच पत्रात मा प्रशांत लोंढे यांनी उपोषणापासून परावृत्त होण्याची आदरपूर्वक विनंती केली आहे परंतु प्रशासनाच्या अशाप्रकारच्या दिरंगाईच्या वर्तनाने अधिक व्यथित झाल्याने माननीय प्रशांत लोंढे यांचे आमरण उपोषण प्रत्यक्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील. असे सम्यक क्रांती मंच चे प्रवक्ते स्वप्नील गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी सम्यक क्रांती मंच चे संस्थापक सिद्धार्थ जाधव, बहुजन समाज पार्टी चे रवी सर्वगोड, नगरसेवक अंबादास धोत्रे, आम आदमी पार्टी चे नागेश पवार, शहीद टिपू सुलतान युवक संघटना शहराध्यक्ष जमीर तांबोळी इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button