Amalner

नीम येथील गावठीहातभट्टी दारू साठा उध्वस्त ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गावकरी तरुणांनी घेतला पुढाकार

नीम येथील गावठीहातभट्टी दारू साठा उध्वस्त ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गावकरी तरुणांनी घेतला पुढाकार

रजनीकांत पाटील

अमळनेर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अध्यपही गावठी दारू हातभट्टी चे प्रमानात वाढ होत असताना दिसत असल्याने कोरोना आजाराची खबरदारी घेत खेड्यातील तरुण नागरिक खंबीर होत असून गावोगावी हात भट्टी उध्वस्त करण्यात येत आहेत. तालुक्यातील निम येथील चार हात भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या.
निम गावात सरपंच भास्कर चौधरी, उपसरपंच नारायण कोळी, संभाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील सदस्य, ग्रामसेवक त्याचबरोबर शिवनेरी मित्र मंडळाचे तरुण युवक व ग्रामस्थांच्या सहकार्याने निम गावातील चार दारू भट्ट्या उध्वस्त करून गावात दारू बंदी करण्यात आली.

तीन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीचा दारू बंदीचा ठराव मारवड पोलिस स्टेशन ला देण्यात आला होता. शनिवारी मारवाड पोलिस स्टेशन चे ए पी आय राहुल फुला व गावातील तरुणांनी रात्री आठ वाजता एक दारू भट्टी उध्वस्त केली होती. उर्वरित भट्ट्या आज गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत उध्वस्त केल्या. दारूचे ड्रम गावाच्या चौकात आणून ते ड्रम गाववासियांच्या समोर जाळून तोड फोड करून त्यांची जाळून टाकण्यात आले.

गावात दारूबंदीचा निर्णय घेतला त्या दिवसापासून गावात चोरून गुपचूप दारू विक्री करण्यात येत होती. १० रु. विकण्यात येणारा गावठी दारूचा ग्लास ६० रुपयांना विकला जात नागरिकांनकडून लूट होत असल्याचे दिसत व पुढील तरुण पिढीला नशेच्या आधीन होण्याची वाचवले. या याबाबत गावात कौतुकास्पद बाब ठरली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button