छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करुन प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत दादा पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथ वाडी येथे कोरोनाच्या संकटाकाळी उत्तम कामगिरी युवक वर्गाने केली असून.या शिबिरामुळे नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल.लाॅकडाऊन असल्याने नागरिकांना रक्तदान करता येत नसल्याने,रक्ताचा
तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या महामारीवर, विविध अजारांवर रूग्णांना रक्त मिळावे याकरिता रक्तदान हे रुग्णांसाठी जीवनदान ठरते.हिच वेळेची गरज आणि सामाजिक बांधिलकीचे भान लक्षात घेऊन युवकांनी उत्तम उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी लक्ष्मणराव धनवडे,डाॅ.आनंद गाजरे, बळवंत धनवडे, डाॅ. महादेव सरडे,अंबादास गाजरे,उमेश शिंगटे,नाना माने,दिपक खरात आदी मान्यवर उपस्थित होते.






