India

?महत्वाचे…आरोग्य आपल्या हाती..!जाणून घ्या कशी घ्यावी काळजी..!

?महत्वाचे…आरोग्य आपल्या हाती..!जाणून घ्या कशी घ्यावी काळजी..!

आजचा काळ हा स्पर्धेचा काळ म्हणावा लागेल, जिथे सर्वजण एका वेगळ्याच धावपळीत गुंग आहेत. अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा एवढ्याच दोन गोष्टींकडे लक्ष असते. परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात परवडणारे नसते. आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे लक्ष आपण देत असतो याचा विचार केला पाहिजे. आपले आरोग्य आपणच जपले पाहिजे.
आजचे दवाखाने, औषधोपचार, शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो खर्चही सहन करतो. अशातच त्यात जाणारा वेळही खूप असतो. रासायनिक औषधे आपल्याला वरचेवर बरे करतात आणि त्यांचे सेवन जीवनभर करावे लागेल अशी ग्वाही स्वतः डॉक्टरच देतात.
आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही पद्धतीचे आरोग्य अभिप्रेत आहे कारण मानसिक स्थिती जर कणखर नसेल तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. मनात भीती, टेन्शन असेल तर रक्तदाब, डोकेदुखी, हृदय विकार ह्या समस्या उद्भवतात. शरीराची चांगल्या प्रकारे सुव्यवस्था राखायची असेल तर मानसिक आरोग्यही जपले पाहिजे. त्यासाठी आपण योगा, प्राणायाम, मेडिटेशन करू शकतो.
शरीरातील विषारी ग्रंथी घामावाटे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरात कोणताच रोग निर्माण होत नाही. त्याव्यतिरिक्त भरपूर पाणी पिणे, नियंत्रित जेवण करणे आवश्यक आहे. पोटभरून जेवण केल्याने सुस्ती आणि आळस निर्माण होतो. आपल्याला जास्त झोप येते.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी कंन्सलटन्ट)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button