Pandharpur

जनकल्याण हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक हायफ्लो ऑक्सिजन HFNO मशिनचे उद्घाटन संपन्न

जनकल्याण हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक हायफ्लो ऑक्सिजन
HFNO मशिनचे उद्घाटन संपन्न

रफीक आत्तार पंढरपूर

पंढरपुर : पंढरपूर वसंतदादा काळे मेडिकल फाऊंडेशन संचलित, जनकल्याण हॉस्पिटलमध्ये मध्ये अत्याधुनिक हायफ्लो ऑक्सिजन HFNO मशिनचे उद्घाटन उपविभागीय आधिकारी श्री.सचिन ढोले यांचे शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्षस्थानी सौ.संगिताताई काळे होत्या, डॉ.सौ.जयश्री शिनगारे, हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. श्री.अजित जाधव, डॉ विशाल फडे,सद्दाम मनेरी,आण्णा डुबल उपस्थित होते.जनकल्याण हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ हे अत्यंत काळजीपूर्वक रुग्णांवर उपचार करत असतात.ग्रामीण भागातील गरीब व गरजु रुग्णांवर अल्पदरात शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून सेवा हॉस्पिटलमध्ये सेवा केली जाते. कोवीड 19 च्या कालावधी मध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत प्रशासनास अँम्ब्युलंन्स देवून सहकार्य केले तसेच कोवीड पेशंट यांच्यावर काळजीपूर्व उपचार केलेले आहेत असे मा सचिन ढोले,प्रांताधिकारी यांनी सांगीतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button