सुधीर कांबळे हत्या प्रकरण,बहूजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे सह कळंबचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष अटकेत
प्रतिनिधी : सलमान मुल्ला औसा
औसा : औसा तालुक्यातील कार्ला गावात (किल्लारी हत्याकांड) सुधीर कांबळे या बौद्ध तरुणाची गावातील जातीयवाद्यांकडून क्रूर हत्या करण्यात आली आहे,,
प्रथम घात करून गावातील वडाच्या झाडावर मृतदेहाला फाशी देवून आत्महत्या भासविण्याचा बनाव रचल्याचा सुधीरच्या नातेवाईकांचा आरोप आहे, प्रेम संबंधातून सुधीरची हत्या झाली असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात अखेर किल्लारी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला असला तरी, या केसमध्ये पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप सुधीरच्या नातेवाईकांनी केला आहे.
त्यानंतर आज बहूजन विकास मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष डॉ व बाबुराव पोटभरे यानी लातूर येथे औसा चे आमदार अभिमान्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व जातीयवादी पवार याच्या घरावर मनुस्मृती दहन करण्या साठी हजारो कार्यकर्ते जमले होते मात्र लातूर पोलिसांनी मोठा फौज फाटा घेऊन रेणापूर येथे बाबुराव पोटभरे यांच्यासह कळंब तालुक्यासह बहूजन विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल तालुकाध्यक्ष सिद्धर्थ वाघमारे, विशाल वाघमारे आदी सह महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्त्याना अटक केली…!






