Amalner

पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने उत्कृष्ट दिग्दर्शक संदीप घोरपडे व उत्कृष्ट अभिनय भूमिका घोरपडे यांचा सत्कार

पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने उत्कृष्ट दिग्दर्शक संदीप घोरपडे व उत्कृष्ट अभिनय
भूमिका घोरपडे यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी-१७ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगांव केंद्रातून अमळनेर येथील सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अ..आ..आकलन या बालनाटयाला प्रथम पारीतोषीक जाहीर झाले.

अमळनेर सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव संदीप घोरपडे उत्कृष्ट दिग्दर्शनचा प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. तर त्यांची मुलगी भूमिका घोरपडे हिला उत्कृष्ट अभिनयाचा पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या यशाबद्दल पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट दिग्दर्शक संदीप घोरपडे व मुलगी उत्कृष्ट अभिनयक भूमिका घोरपडे, शिक्षिका, सौ गितांंजली घोरपडे यांचा
सत्कार शाल,बुके,टोपी,पेन देऊन
सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, वाचनालयाचे माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख,सयुक्त चिटणीस सुमीत धाडकर संचालक ईश्वर महाजन ,दिपक वाल्हे,भगीनी मंडळाच्या शिक्षीका ज्योतीर्मयी बाविस्कर उपस्थित होत्या.

सत्काराला उत्तर देतांना संदीप घोरपडे यांनी अ…आ..आकलन या बालनाट्य बसविण्यासाठी कोणकोणत्या अडचणी आल्या व मुलींनी किती मेहनत घेतली याबाबत सविस्तर अनुभव कथन केले.तर उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक प्राप्त करणारी भूमिका घोरपडे हिने आम्हाला हे बालनाट्य सादर करण्यासाठी अमळनेर येथील शिवाजी नाटय सभागृहात व्यासपीठ उपलब्ध करून जर दिले तो खरा आमचा सत्कार असेल असे.सांगितले. या बाबत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख यांनी व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
फोटो

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button