कोरोनाला संपवूया आणि मगच मामाच्या गावाला जाऊया
भाचे कंपनी नाराज-नातेवाईकांचा ऑनलाइन संवाद वाढला
औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या आत्याच्या गावाला जाण्याची एक वेगळीच मजा असते.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणूजन्य आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन पाळला जात आहे .यावर्षी कोरोनाने मामाच्या गावाला जायची वाटच अडवली असल्याने मामाच्या गावाला जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.दरवर्षी शाळकरी मुलं उन्हाळी सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी पाहुण्यांच्या गावाला जातात मात्र यावर्षी कोरोनाने मुलांची मौजमजा आनंद हिरावून घेतला आहे.
कोरोनाच्या या महाभयंकर संकटाने जगभरातील विविध क्षेत्रांसह वयोगटांना आपल्या कवेत घेतले आहे.
उन्हाळ्यातील सुट्टीकरिता जाण्यासाठी अडचणी आल्याने लहान मुले हिरमुसली आहेत. शिवाय यंदा मामाचे गाव गाठणे ही हुकणार आहे. त्यामुळे त्यांचे चेहरे केविलवाणे नाराज दिसत आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आजारापासून दूर राहण्यासाठी घरातल्या वडीलधार्या मंडळींकडून घराबाहेर पडू नये,काळजी घेण्याकरिता दरडावून सांगण्यात येत आहे.
यामुळे स्वतःच्या गावातही मित्र सवंगड्यांसह मौजमजा करण्यावर जबर निर्बंध घालण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे एक-दोन दिवसाच्या पर्यटनावरही निराशेची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे यंदाची सुट्टी ही सुट्टी नसून जबरदस्त शिक्षा वाटत आहे. घराबाहेर न पडणे हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी, कोरोनापासून बचावासाठी अत्यंत गरजेचे आहे, हे मुलांना कोणत्या भाषेत सांगायचे कसे सांगायचे हा प्रश्न पालकांसमोर भेडसावत आहे.
लॉक डाऊन मुळे नातेवाईक सध्या विडिओ कॉल च्या माध्यमातून ऑनलाइन संवादावर भर देत आहेत.
घरी बसून कंटाळलेल्याना वेगळाच अनुभव येत आहे.
【 *कोरोना लॉकडाऊन च्या सुट्ट्यांचा वेगळाच अनुभव*】
टिव्ही मोबाईल वरील कार्टून, कॅरम नानाविविध प्रकारचे गेम खेळांना मुले केंव्हाच वैतागली आहेत. काही जणांच्या परीक्षा न होताच अशी विचित्र सुट्टी मिळाल्याने वेगळाच अनुभव येत आहे. एरव्ही हवीहवीशी वाटणारी सुट्टी यंदा मात्र नकोनकोशी झाली आहे. परिणामी कोरोना कधी संपेल , आणि अगोदर सारखं जनजीवन पूर्ववत होईल , याकडे मुलांचेही लक्ष लागून राहिले आहे.
१) *”दरवर्षी मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी आई, छोटी बहीण,आजोळी औसा तालुक्यातील तपसे चिंचोली गावात,व मावशीच्या गावाला जातो. पण यावर्षी कोरोना या आजारामुळे मामाच्या गावाला जाणं होणार नाही.यामुळे आम्ही भावंड खूप निराश आहोत.”*
_:- श्रावणी सुरेश सांगवीकर (भाटसांगवी, ता चाकूर)_
२) *”उन्हाळी सुट्टी लागली की आम्ही दरवर्षी मामाच्या गावी तपसे चिंचोली ला जायचो, पण कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन पाळला जात असल्याने घराबाहेर पडणं कठीण आहे. आणि बससेवा बंद असल्यामुळे मामाचं गाव गाठणे कठीण झाले आहे.”* : –
_प्रांजली मल्हारी डोलारे (औरंगाबाद )_






