Maharashtra

तपसे चिंचोली मध्ये वटपौर्णिमा साजरी

तपसे चिंचोली मध्ये वटपौर्णिमा साजरी

औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-
तपसे चिंचोली परिसरात वटपौर्णिमा सण शुक्रवारी धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
यादिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे म्हणून हे व्रत करतात.
यावेळी गावातील महिलांनी वटवृक्षाला धागे गुंडाळून औक्षण करीत भक्तिभावाने पूजा केली.
शुक्रवारी सकाळपासूनच महिलांची घरोघरी लगबग सुरु होती.सुवासिनींनी आकर्षक साड्या परिधान करून गावातील खंडोबा मंदिर, दत्त मंदिर,बसस्थानक परिसर, जुने गाव परिसरातील वडाच्या झाडाची सामाजिक अंतर ठेवून, कोरोना बद्दल सुरक्षितता राखत विधिवत पूजा केली. यावेळी संपताबाई नेटके,कुसुम शिंदे, कालिंदाबाई नेटके, नकुला सरवदे,राजाबाई गरड,विमल नेटके,सिंधुबाई गरड,अनिता नेटके,रंजना कोरे, प्रियंका नेटके,अरुणा जोगी, स्वाती नेटके, शारदा गरड,सुमन येरनुळें,किरण नेटके, आदी महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button