परंडा येथे नेहरू युवा केंद्राच्या मिनी मॅरेथॉनला उस्फुर्त प्रतिसाद
सुरेश बागडे
परंडा भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या आदेशानुसार
नेहरू युवा केंद्र धाराशिव (भारत सरकार) यांच्या वतीने परंडा येथे फिट इंडिया मोव्हमेंट कार्यक्रम अंतर्गत दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ९ वाजता मिनी मॅरेथॉन आयोजन करण्यात आले.
परंडा पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे , डॉ. आनंद मोरे ,महावीर तनपुरे , शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे प्रा डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मिनी मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रा डॉ संभाजी गाते, प्रा डॉ बी बी राऊत, प्रा डॉ गजेंद्र रंदील,प्रा डॉ अरुण खर्डे,प्रा डॉ एच एम गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ सचिन च०हान, प्रा सचिन साबळे आदि उपस्थित होते. महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ विभागातील विद्यार्थी, विधार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते’. प्रत्येक नागरिक सशक्त ,निरोगी व सदृढ असावा या दृष्टीने जनजागृती हेतू फिट इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यात,जिल्ह्यात, तालुक्यात करण्यात आले होते.
तसेच आरोग्यपर जनजागृती कार्यक्रमासाठी शिक्षणमहर्षी गुरुवर्य .रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा, कमांडो करिअर अकॅडमी परंडा , क्रांतीसंगर करिअर अकॅडमी परंडा ,श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी,तसेच उपजिल्हा रुग्णालय परंडा इ. सहभागी संस्थेचे युवक, युवती,शिक्षक, तसेच परंडा शहर नागरिक या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते.
या मिनी मॅरेथॉनमध्ये एकूण २१० सहभागींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्र धाराशिव (भारत सरकार )परंडा तालुका समन्वयक रणजीत पाटील , रामेश्वर चोबे तसेच सुजित शिंदे,राहुल कडबने इ परिश्रम घेतले .






