चोपडा औद्योगिक विकास केद्राला शासनाची मंजुरी ; ११७ एकरमध्ये होणार एम आय आयट डी सी
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : चोपड्याचे माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे आमदार लता ताई सोनवणे यांनी चहार्डी ता चोपडा येथील सरकारी व खाजगी जागेची माहीती देत अनुसूचित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करावे या मागणीसाठी राज्य शासनाच्या उद्योग लिमिटेड, ऊर्जा व कामगार विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्याच्या या प्रयत्नांना यश आले असून शासनाने चोपडा औद्योगिक विकास केद्राला मंजुरी दिल्याने ११७ एकरमध्ये एमआयडीसी होणार असून तालुक्यातील जनता आणि शेतकऱ्यां ना रोजगार प्राप्त होणार असल्याची माहिती माजी आ प्रा चंद्रकांत सोनवणे आणि आ लता सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना माजी आमदार प्रा म्हणाले की चोपड्याचे माजी आमदार असतांना ३ नोव्हेंबर २०१५ ला चहार्डी येथील सरकारी आणि खासगी जागेची माहिती दिली होती. तसेच १९ जुलै २०१६ ला पुन्हा कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन अधिसूचना करणेबाबत चर्चा केली होती . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, पालक मंत्री गुलाबराव पाटील ना. बाळासाहेब थोरात अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांचे आभार मानले आहे. माजी आ प्रा चंद्रकांत सोनवणे म्हणाले की, चोपडा तालुका हा विकासापासून वंचित असुन एम आय डीसी माध्यमातून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईलच तसेच शेतीपूरक उद्योग यावेत अशी भावना व्यक्त केली..






