काळ्या यादीतील डॉक्टर पालकमंत्र्यांच्या बैठकीस उपस्थित कसा
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास कोविड हॉस्पिटल बनवून आपला गल्ला भरण्यासाठी पंढरपूरातील एक काळ्या यादीतील खाजगी डॉक्टर पालकमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी आला कसा अशी चर्चा या बैठकीस उपस्थित असणारे अधिकारी व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये सुरू आहे.शुक्रवार दि. 19 रोजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना व आषाढी यात्रेसंदर्भात घ्यावयाची काळजी याविषयी चर्चा करण्यासाठी विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत खाजगी हॉस्पिटल्स कोविड हॉस्पिटल म्हणून घेण्यापेक्षा अद्ययावत सोयी सुविधा असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयास कोविड हॉस्पिटल करावे अशी ठाम भूमिका पंढरपूरातील डॉ. पंकज गायकवाड यांनी मांडली होती.
प्रत्यक्षात डॉ. पंकज गायकवाड हा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक असताना 16 डॉक्टरांना घेऊन अचानकपणे राजीनामा देऊन बाहेर पडला होता. त्यावेळी स्थानिक आ. भारत भालके यांनी देखील 10 वेळा फोन करून सुद्धा या डॉ गायकवाडने त्याचा फोन सुद्धा घेतला नव्हता. अशा या डॉक्टर गायकवाड यांच्यावर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य उपसंचालक पुणे यांनी त्याचवेळी बेकायदेशीरपणे अचानक राजीनामा देऊन उपजिल्हा रुग्णालयास वेठीस धरले म्हणून डॉ. गायकवाड यांचे नाव काळ्या यादीत टाकले होते.
असा हा काळ्या यादीतील डॉक्टर पालकमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी कसा उपस्थित राहिला. विशेष बाब म्हणजे उपजिल्हा रुग्णालयास कोविड हॉस्पिटल करावे अशी मागणी करुन हा डॉ. गायकवाड खाजगी डॉक्टर आणि हॉस्पिटल यांचा गल्ला भरण्यासाठी बैठकीत उपस्थित होता काय ? असा प्रश्न बैठकीस उपस्थित अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्याकडून विचारला जातो आहे.स्थानिक जनतेचे आमदार असणाऱ्या आ. भारत भालके यांनी त्यांना न जुमानणाऱ्या या काळ्या यादीतील डॉ. गायकवाडला शासकीय बैठकीत बोलू कसे दिले. नगरपालिका 65 एकर परिसरात कोविड हॉस्पिटल करण्यासाठी रितसर परवानगी, तसेच आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळाली असून बुधवार दि. 24 जून 2020 रोजी या कामाची निविदा काढणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मानोरकर यांनी सांगितले आहे.
असे असताना आता पुन्हा उपजिल्हा रुग्णालयास कोविड हॉस्पिटल करण्याचा घाट कशासाठी मांडला जातो आहे. मागील आठवड्यात प्रांताधिकारी यांनी पंढरपूरातील 3 हॉस्पिटल कोविडसाठी घेऊन डॉक्टरांची नेमणूक देखील केली होती. असे असताना पुन्हा उपजिल्हा रुग्णालयास कोविड हॉस्पिटल करु नये म्हणून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, विद्यमान बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांनी पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांना बैठकीनंतर निवेदन दिलेले आहे.या काळ्या यादीतील डॉक्टर विरोधात त्याची मालमत्ता चौकशी करावी तसेच शासकीय सेवेच्या कालमर्यादा संदर्भातील नियमाचा भंग केल्याप्रकरणी शासकीय नियमानुछसार जो दंड आकारण्यात येतो तो भरण्यात आला आहे का याची ही चौकशी करण्याची मागणी राज्यपाल, आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक यांच्याकडे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी करणार आहेत.






