Nashik

स्वातंत्र्य दिनानिमित्त व महाकवी वामन दादा कर्डक यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

स्वातंत्र्य दिनानिमित्त व महाकवी वामन दादा कर्डक यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

नाशिक प्रतिनिधी – डॉ .राजेश साळुंके –

दि.१५ अॉगस्ट २०२० रोजी भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका व समता रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड वसतिगृह दिंडोरी येथे 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व महाकवी वामन दादा कर्डक यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गांगुर्डे सरचिटणीस रितेश गांगुर्डे व समता रक्तपेढी नाशिक डॉक्टर इरफान खान कुटुंब फौंडेशन नाशिक सुचित्राताई आहिरे यांनी तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे प्रतिमापूजन करून उदघाटन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, पोलीस, मिलिटरी, आरोग्य कर्मचारी अहोरात्र परीश्रम घेत आहेत, मग आपलीही काहीतरी जबाबदारी बनतेच म्हणून रक्तदान शिबिरासाठी दिंडोरी तालुक्यातील सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तरुणांनी व कार्यकर्त्यांनी प्रंचड उत्साह दिला व रक्तदान शिबिरात सहभागी झाले.
आजच्या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा, वंचित बहुजन दिंडोरी तालुका व संपूर्ण कार्यकारणी, कुटुंब फाउंडेशन नाशिक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालुक्याने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून तरुनासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आणि आजच्या कार्यक्रमातून दाखविले की खरे देशप्रेम हे फक्त फोटो काढून न दाखवता तर देशाला गरज असेल अशा परिस्थितीत आपण आपलं कर्तव्य पार पाडले पाहिजे. कोरोनाच्या परिस्थिती मध्ये रक्ताचा तुडवडा मोठ्या प्रमाणावर भासत असल्याने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एक देशसेवा सर्व रक्तदात्यांच्या माध्यमातून पार पडली.

आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित कोषाध्यक्ष चंद्रकांत पगारे,पर्यटन सचिव प्रदीप गांगुर्डे,संस्कार सचिव जयेश मोरे,संकेत साळवे,किशोर काळू सोनवणे, हिरामण गायकवाड, घनश्याम शिंदें, शरद गांगुर्डे,अमोल पगारे, देवसिंग खरे, बाळासाहेब शेजवळ, चेतन गांगुर्डे, नितीन निकम,निखिल शिरसाठ,संकेत निकम, योगेश एलिंजे,रोहन लोखंडे,महेंद्र निकम,राकेश साळवे, कुणाल साळवे,गणेश गांगुर्डे, विकास गांगुर्डे, प्रमोद जाधव इ मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button