Pandharpur

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी पुरवणी अर्थसंकल्पात 14 कोटीच्या आराखड्यास मान्यता

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी पुरवणी अर्थसंकल्पात 14 कोटीच्या आराखड्यास मान्यता

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश, या आर्थिक वर्षात 1 कोटी 74 लाखाची तरतूद

प्रतिनिधी
रफिक आतार

सोलापूर, दि.24(जिमाका):- येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक तसेच टॉवरच्या बांधकामासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणी अर्थसंकल्पात 14 कोटी 24 लाख 92 हजाराच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. तर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षात स्मारकाच्या कामकाजासाठी 1 कोटी 73 लाख 91 हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे. या निधीसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. स्मारकाचा अंदाजीत आराखडा व त्यासाठीचा निधी मंजूर झाला असल्याने पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या प्रांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारणी कामाच्या निधीसाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असून यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या मागणी अर्थसंकल्पात स्मारकाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून चालू वर्ष साठी 1 कोटी 73 लाख 91 हजाराची तरतूद करण्यात आल्याने या स्मारकाचे काम लवकरच सुरु होणार असून हे स्मारक पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button