Yawal

मारुळ येथे आमदार श्री शिरिष दादा चौधरी यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

मारुळ येथे आमदार श्री शिरिष दादा चौधरी यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

शब्बीर खान मारुळ ता. यावल

यावल : यावल येथे 15 ऑगस्ट चे अवचित्त साधुन गावात विविध विकास कामांचे रावेर /यावल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा भावी मंत्री आदरणीय श्री शिरिष दादा चौधरी यांच्या शुभहस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले या शुभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषद गटनेते तथा जि.प.सदस्य आदरणीय श्री प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल पंचायत समिती गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य आदरणीय श्री शेखर दादा पाटील यावल प. स. सदस्य आदरणीय श्री सरफराज तडवी, शेतकरी खरेदी-विक्री यावल संघाचे चेअरमन आदरणीय श्री सुनील दादा फिरके यावल शहराध्यक्ष आदरणीय कदीर खान इत्यादींसह इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले मुस्लिम कब्रस्तान चा वर्षानुवर्षांचा प्रश्न म्हणजे मुस्लिम कब्रस्तान मध्ये सर्व गावचे घाण सांडपाणी शिरत असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखत होत्या त्या अनुषंगाने हा प्रश्न सोडविणे फार महत्त्वाचे होते तसेच गावातील रस्त्यांचा प्रश्न गटारांचा प्रश्न या बाबी लक्षात घेऊन काँग्रेसचे कणखर नेते आदरणीय श्री जावेद अहमद सय्यद, म. प. सह. सोसायटी. चे चेअरमन आदरणीय श्री जियाऊलहक सैय्यद, तरुण तडफदार नवनिर्वाचित सरपंच आदरणीय श्री असद अहमद सय्यद उपसरपंच पती आदरणीय सलामत अली सय्यद व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन या समस्यांचे निराकरण करण्यासाठी यावल रावेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री शिरिष दादा चौधरी यांच्या समोर वरील समस्यांची कैफियत मांडली आमदार साहेबांनी या समस्यांचे महत्त्व समजून क्षणाचाही विलंब न लावता मारुळ गावासाठी स्थानिक विकास कार्यक्रम सन2020/2021 अंतर्गत आपल्या आमदार निधीतून मुस्लिम कब्रस्तान मधील घाण सांडपाणी गटार बांधकामासाठी ७ (सात)लाख रुपये गावातील रस्ता काँक्रीट करण्यासाठी ६(सहा)लाख रुपये सांडपाणी व्यवस्थापन गटार साठी ३(तीन )लाख रुपये अशी एकूण 16 लाख रुपयांची विविध विकास कामे मंजूर केली त्यामुळे गावाच्या विकासामध्ये नवनिर्वाचित सरपंच आदरणीय श्री असद अहमद सय्यद व त्यांच्या सर्व कार्यकारी मंडळाचे योगदान फार महत्त्वाचे ठरले तरुण तडफदार सरपंचांच्या विकासात्मक कामांचा ध्‍यास मोठा आहे, हे या गोष्टीतून सिद्ध होते तसेच काँग्रेसचे कणखर नेते आदरणीय श्री जावेद अहमद सय्यद यांचे सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन त्यांचे गावा प्रति असलेले प्रेम जिव्हाळा आपुलकी यामधून दिसून येते गावासाठी धडपडणारा नेता ही त्यांची ओळख व वैशिष्ट्य आहे अशाच प्रकारे हा विकासकामांचा गाडा पुढे सरपंच व त्यांचे सहकारी पुढे सुरु ठेवतील यात शंका नाही त्यांच्या विकासकामांच्या ध्यासाने व भूमिकेचे सर्व नागरिक कौतुक करीत असून समाधान व्यक्त करीत आहे या शुभ प्रसंगी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मसरूर अली सय्यद आदरणीय सरपंच श्रीअसद सय्यद, उपसरपंच पती आदरणीय श्री सलामत अली सय्यद ग्रा. प. सदस्य श्री, मुर्तजा अली सय्यद श्री सुलतान पटेल श्री सिताराम पाटील श्री नदीम सय्यद श्री मतीवर रहमान सय्यद श्री एकनाथ पाटील पोलीस पाटील श्री नरेश मासोळे श्री मुक्तार उद्दीन फारुकी श्री रफत अली सय्यद श्री हिरामण पाटील श्री संजय तायडे श्री गफार तडवी श्री अमीर तडवी श्री झिपरू तडवी श्री शेख तौसिफ युवा यावल तालुका अध्यक्ष श्री इखलास सय्यद, श्री मुक्ती साहेब श्री खालिद मौलाना श्री मोना मेम्बर ग्रा. वि. अधिकारी श्री बि. के. पारधी, श्री कबीर फारुकी श्री बाळू तायडे श्री युवराज इंगळे प्रवीण हातकर साहेब अली सय्यद, मसरत अली सय्यद,राजू तडवी, सलीम तडवी,भानुदास मेढे कालुगा तायडे कारकून परवेझ सय्यद सर्व ग्रा. पण. कर्मचारी इत्यादी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button